30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरमहापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा आणखी सुधारणार

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा आणखी सुधारणार

सोलापूर / प्रतिनिधी

शहरातील गरीब व गरजूसह सर्व नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असून यासाठी विविध उपाययोजना आणि प्रयत्न सुरू आहेत. आता यापुढे शहरातील नागरिकांसाठी आणखी विविध सुविधांसह आरोग्य सेवा पुरविण्यात येणार असून यामध्ये सुधारणा देखील करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली.

महापालिका आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा व विविध सुधारणा संदर्भात महापालिका उपायुक्त तथा आरोग्य विभागाचे नियंत्रण अधिकारी आशिष लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य बैठक झाली. या बैठकीस प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी व इतर संबंधित अधिकारी आणि डॉक्टर उपस्थित होते. यावेळी उपायुक्त लोकरे यांनी आरोग्य विभागाचा सखोल व निर्देशांकनिहाय आढावा घेतला. शहरवासीयांना दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा देण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. माता मृत्यू, बाल मृत्यू तसेच प्रसूतीदरम्यान होणाऱ्या गुंतागुंती टाळण्यासाठी आणि आपल्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांच्या नियमित संपर्कात राहून आरोग्य केंद्रातील विविध आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक नागरिकांना प्रवृत्त करण्याबद्दल सूचित केले.

किशोरवयीन मुले मुली हे समाजाचे महत्वाचे घटक असून त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याकडे वेळीच आणि पुरेसे लक्ष दिल्यास भविष्यात सुदृढ आणि निकोप समाज निर्मिती होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यानुसार आता विविध उपाययोजना, नवीन सेवांमध्ये वाढ व दर्जेदार उपचार पद्धती यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR