40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeपरभणीएटीएम मशीन बंद असल्याने ग्राहकांची तारांबळ

एटीएम मशीन बंद असल्याने ग्राहकांची तारांबळ

पूर्णा : शहरातील महाविरनगर येथे भारतीय स्टेट बँकेला लागुन असलेल्या ए.टी.एम. मधील सीडीएम मशीन मागील दिड महिन्यांपासून बंद आहे. यामुळे बँकेच्या ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बँक ग्राहक ग्राहक सेवा केंद्रात जात आहेत परंतू या ठिकाणच्या व्यवहाराला मर्यादा असल्याने सामान्य ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

शहरातील सीडीएम मशीन काम करीत नसल्याने ग्राहकांना भारतील स्टेट बँकेच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्रात जावे लागत आहे. परंतू ग्राहक सेवा केंद्रांना बँकेने ठरवुन दिलेली लिमीट आहे. ग्राहक सेवा केंद्रात २० हजार पर्यंतच्या व्यवहाराला परवानगी आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना त्यापेक्षा जास्त पैसे भरण्यासाठी त्रास होत आहे. शहरातील ग्राहक सेवा केंद्रावर चकरा माराव्या लागत आहेत. सि.डी.एम. मशीन बंद असल्यामुळे ग्राहकांना दवाखाना, हॉटेल, किराणा आदींचे बिल अदा करण्यासाठी दुकानदारास जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आर्थीक भुर्दंड सोसावा लागत आहे. संबंधित वरीष्ठ अधिका-यांनी तात्काळ लक्ष देवून ग्राहकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी बँकेच्या ग्राहकातुन पुढे येत आहे.

लवकरच सीडीएम मशीन बसवणार : कटोले
सदरील सीडीएम मशीन ही जुनी झाली आहे. मशीन व्यवस्थित चालत नसून नवीन सीडीएम मशीनची मागणी केली आहे. लवकरच सीडीएम मशीन पूर्णेकरांच्या सेवेसाठी बसवण्यात येईल अशी प्रतिक्रिया शाखा प्रबंधक गोपाळ कटोले यांनी दै. एकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR