40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रराजांची संपत्ती काय विचारताय?

राजांची संपत्ती काय विचारताय?

सातारा : अवघ्या महाराष्ट्राच्या राजाकडे किती संपत्ती असेल, विचारायची असते का? यंदा लोकसभा निवडणुकीत छत्रपती घराण्यांकडून दोन उमेदवार वेगवेगळ्या पक्षांकडून उभे आहेत. एक कोल्हापूरला दुसरे साता-यात. पैकी कोल्हापुरच्या शाहु महाराजांनी आपली संपत्ती घोषित केली आहे. राहिली होती ती उदयनराजेंची. आज उदयनाराजेंनीही आपली संपत्ती घोषित करून टाकली आहे.

उदयनराजे साता-यातून महायुतीकडून लोकसभा लढवत आहेत. आज त्यांनी अर्ज दाखल केला असून त्यांनी यामध्ये संपत्ती घोषित केली आहे. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी २९६ कोटी रुपये संपत्ती जाहीर केली होती. उदयनराजेंनीही तेवढीच संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. उदयनराजे आणि भोसले कुटुंबीयांची एकूण संपत्ती ही २ अब्ज ९६ कोटी ३९ लाख ११ हजार ५८५ रुपये एवढी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR