40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeपरभणीस्मशानभूमीत बांधली सात जन्माची गाठ

स्मशानभूमीत बांधली सात जन्माची गाठ

परभणी : स्मशानभूमी म्हटलं की सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होते ती भीती. मात्र याच स्मशानभूमीमध्ये साईनाथ जाधव आणि लक्ष्मी मिरेवाड यांनी सात जन्माची गाठ बांधत समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मनामधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये लग्न केल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

साईनाथ हा मूळचा हिमायतनगर जिल्हा नांदेड इथला असून लक्ष्मी परभणी जिल्ह्यातली आहे. दोघांचेही वडील हे मसनजोगी आहेत. पिढया ना पिढी हे उदरनिवार्हासाठी स्मशान सांभाळायचं काम करत आहेत. दोघांचेही घर स्मशन भुमीत असल्यामुळे लग्न सुद्धा याच ठिकाणी लावण्याचा निर्णय घरच्या मोठ्या मंडळींनी घेतला व त्यानुसार यशस्वीरित्या लग्न रीतीरीवाज नुसार पार पडले.

नागरिकांच्या मनामध्ये असलेली भीतीचे वातावरण दूर करणे हाच उद्देश असल्याने त्यांनी या ठिकाणी लग्न केले असल्याचे नातेवाईक सांगत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वारंवार अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र समाजामध्ये अंधश्रद्धा कायमच असल्याने स्मशानभूमी मध्ये लग्न करण्यात आली नाही. या दोन्ही परिवारांनी धाडसी निर्णय घेत स्मशानभूमी मध्ये लग्न लावून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR