दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सोमवारी इतिहास घडला श्रीलंकेचा मधल्या फळीतील फलंदाज एन्जेलो मॅथ्यूजला ‘टाईम आऊट’ बाद दिले गेल. खरे तर या जंटलमन्स गेम मध्ये बांगलादेश कर्णधार शकीबने ‘टाईम आउट’ चे अपील केले मैदाना वरील पंचानी त्याला एकही चेंडू न खेळता तंबूत परत पाठवले . यावेळी पंचाने बांगलादेश कर्णधाराकडे अपील मागे घेण्याबद्दल विनंती केली पण त्याने ते नाकारले तसे बांगलादेशी खेळाडूनी रडीचा डाव केला. या घटनेवर सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. याला खिलाडूवृत्तीचा अभाव असेच म्हणावे लागेल. एवढ्या एका निर्णयामुळे बांगलादेशच्या विजयी होण्यात काही फरक पडला नाही आणि नाही तरी तो शेवटच्या क्रमांकावरच आहे . पूर्वी इतिहासातील सोळा वर्षांपूर्वीची घटना आठवते ती म्हणजे दक्षिण आफ्रिकन कर्णधार ग्रँहम स्मिथ ने सौरव गांगुली विरुद्ध सहा मिनिटे उशिरा आला तरी टाईम आऊट अपील केले नव्हते त्यावेळी सचिन तेंडुलकर चा फलंदाजीसाठी येण्याचा क्रम होता पण त्याने १८ मिनिटे फिल्ंिडग केली नसल्यामुळे त्याला लगेच फलंदाजीसाठी संधी नव्हती आणि भारताच्या दोन विकेट पहिल्या दहा मिनिटातच गेल्या तेव्हा सौरभ गांगुलीला जामानीमा करुन यावयास थोडावेळ लागला. ग्रँहम स्मिथही सौरव गांगुलीला टाईम आऊट करू शकला असता पण त्याने ते केले नाही. याला म्हणायचे सभ्यग्रहस्थांच्या खेळातील खिलाडूपणा.
ही इतिहासातील पहिली घटना जरी नमूद झाली तरी क्रिकेट रसिकांच्या डोक्यात शिरली नाही. टाईम आउट बद्दल एवढा विचार केला प्रत्येक षटकानंतर बारावा खेळाडू मैदानात येऊन पाणी द्यायची किंवा मेसेज पोहोचण्याची काय गरज आहे. प्रत्येक सामन्यामध्ये ड्रिंक्स इंटरवल ठरवलेला असतानाही हा एक्स्ट्रा वेळ का वाया घालवायचा त्यामुळे खेळाचा वेळ किती वाया जातो यावर ही विचार होणे गरजेचे आहे . त्यामुळे तर सामना वेळेत होत नाही आणि मग कर्णधाराला दंड ठोठावला जातो अगदीच उलटा विचार केला तर फलंदाजाने आपल्या सर्व साहित्यासह दोन मिनिटाच्या आत क्रीजमधे पोहोचणे गरजेचे होते . मग मॅथ्युज सारख्या अनुभवी फलंदाजाने आपले सर्व साहित्य सुस्थितीत आहे की नाही हे पाहणे गरजेचे होते याला फलंदाजाचा निष्काळजीपणा असेही म्हणता येईल पण या सर्व घटनेनंतर बांगलादेश कर्णधार शकिबुल हसन हा मात्र व्हिलन ठरला नियमाप्रमाणे दोन मिनिटाच्या आत फलंदाजीसाठी पोहोचणे गरजेचे होते पण क्रिजवर आल्यानंतर त्याला ही त्रुटी जाणवणे हे फारच झाले एलबीडब्ल्यू बद्दलचा युडीआर एस चा निर्णय सुद्धा वादग्रस्त ठरतो. चेंडू डाव्या यष्टीला स्पर्श करून गेला तर अंपायर चा निर्णय तिसरा अंपायर उचलून धरतो. खरे तर चेंडू डाव्या यष्टीला टच झाला तरी त्याला बाद दिले पाहिजे. कारण चेंडू उजव्या यष्टीला जरा जरी टच झाला तरी तिसरा अंपायर मैदानावरील पंचाचा निर्णय बदलण्यास भाग पडतो हे मात्र अनाकलनीय आहे.
सामन्यानंतर चौथे पंच एड्रियन होल्डस्टॉक यांनी स्पष्ट केले की, अँजेलो मॅथ्यूज याला नियमानुसारच बाद घोषित केले आहे. ब्रॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत एड्रियन होल्डस्टॉक टाईम आऊट बादविषयी बोलताना म्हणाले, ‘‘आयसीसी विश्वचषक प्लेइंग कंडिशनमध्ये नमूद केले गेले आहे की, जेव्हा टाईम आऊटची वेळ येते, तेव्हा विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर, नवीन फलंदाज किंवा मैदानातील उपस्थित फलंदाजाला पुढील दोन मिनिटात चेंडू खेळण्यासाठी क्रीझवर सज्ज व्हावे लागते.’’ ‘‘प्रोटोकॉलनुसार, टीव्ही पंच विकेट पडल्यानंतर ही दोन मिनिटे जोडतात.
त्यानंतर ते मैदानी पंचांना संदेश देतात. आज जी घटना घडली, त्यात फलंदाज दोन मिनिटांच्या आत चेंडू खेळणा-या पोझिशनमध्ये नव्हता. त्यापूर्वी त्याच्या हेल्मेटची पट्टीमध्ये समस्या होती. श्रीलंकेचा अष्टपैलूच्या हेल्मेट पट्टी तुटल्यामुळे आधीच दोन मिनिटे पूर्ण झाली होती.‘‘प्लेइंग कंडिशननुसार, क्षेत्ररक्षण संघाचा कर्णधार मैदानात उपस्थित पंचांकडे टाईम आऊटची अपील करू शकतो आऊटमध्ये वस्तूंच्या खराब होण्याचे नमूद नाहीये का?’’ यावर ते म्हणाले की, ‘‘नाही, एक फलंदाज म्हणून नेहमीच तुम्हाला मैदानावर उतरण्यापूर्वी आपल्या वस्तूंची तपासणी करावी लागते, कारण पुढील दोन मिनिटात तुम्हाला मैदानावर चेंडूचा सामना करायचा असतो. एक चेंडू खेळल्यानंतर हे झाले असते तर प्रश्न आला नसता.
मैदानाबाहेरून
– डॉ. राजेंद्र भस्मे कोल्हापूर,
मोबा. ९४२२४ १९४२८