38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर मोठा अपघात; एक ठार

समृद्धी महामार्गावर मोठा अपघात; एक ठार

छ. संभाजीनगर : धामणगाव तालुक्यातील तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १२४ जवळ उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने यामध्ये पश्चिम बंगाल राज्यातील ट्रकचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

कंटेनर ट्रक क्रमांक एन. एल. ०१ ए.ए. ४१९० ने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. त्यामुळे अपघात झाला. ट्रक क्रमांक यूपी ७२ एटी ३३०२ चा चालक मो. इब्राहिम मो. इलियास प्रतापगड उत्तर प्रदेश व क्लीनर मो. अमीर मो. सलीम खान प्रतापगड (उत्तर प्रदेश) हे ट्रकचे टायर रोडच्या साईडला ट्रक उभा करून बदलत होते. त्याचवेळी उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली त्यामुळे अपघात झाला.

यात चालक सुभाष चंद्रबोद बोदरा (रा. पाला हावडा, पश्चिम बंगाल) हा ट्रकमध्ये अडकला होता. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. महामार्गाच्या कर्मचा-यांनी सदर ट्रकचालकाला बाहेर काढून त्याला तसेच दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे पाठविले. पोलिसांनी अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR