Homeलातूरशारदा इंटरनॅशनल स्कूलचे दहावीच्या निकालात उत्तुंग यश 

शारदा इंटरनॅशनल स्कूलचे दहावीच्या निकालात उत्तुंग यश 

लातूर : प्रतिनिधी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत शारदा इंटरनॅशनल स्कूल, लातूर या शाळेने पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा सुंदर संगम म्हणजेच हा उज्ज्वल निकाल होय.
या परीक्षेत रणवीर ज्ञानेश्वर साळुंखे याने ९९.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. आरुषी निलेश मोरे हिने ९७.८० टक्के गुणांसह द्वितीय तर आदित्य श्रीकांत गडे याने ९७.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. शैलजा विठ्ठल दाडगे हिने ९६.६० टक्के गुणांसह चौथा, तर  गौरवी अभय खंदारे हिने ९२.२० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला.
एकूण १०३ विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी ११ विद्यार्थ्यांनी ९५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. २५ विद्यार्थ्यांनी ९० ते ९४.९९ टक्के गुण, तर ३५ विद्यार्थ्यांनी ८० ते ८९.९९ टक्के गुण मिळवले आहेत.  विद्यार्थ्यांच्या जिद्दीने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल रॉयल एजुकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील, उपाध्यक्ष श्री. एल. एम. पाटील, प्राचार्य डी. एम. घारगे, उपप्राचार्या शिला शेळके व वैशाली गिरवलकर, समन्वयिका रेहमत सय्यद व निसा नायर, परीक्षा विभाग प्रमुख मेघा जगदाळे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR