38.3 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रबंडखोरीवरून राज्यातील ‘प्रशांत किशोर’ संभ्रमात

बंडखोरीवरून राज्यातील ‘प्रशांत किशोर’ संभ्रमात

राजकीय नेते तासाभरात बदलायेत पक्ष कोण बाजी मारणार अंदाज बांधणे कठीण

लातूर : सुशीलकुमार मानवतकर
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत किमान कोणाची सरकार येणार किंवा कोणता नेता, पुढारी निवडून येणार यांचा अंदाज तरी बांधता येत होता; माच राज्यात झाल्याचे महायुती आणि महाविकास आघाडीच्या भूकंपानंतर अंदाज बांधणे तर सोडाच पण क्षणात कोण कोणत्या पक्षात आणि कोणाला पाठिंबा देणार हे तर त्या नेत्याला सुध्दा कळत नाही आहे. यातच देशातील दिग्गज असलेल्या राजकीय विश्लेषक आणि स्ट्रेटजी ठरविणारे प्रशांत किशोरही शांत झालेले असल्याने राज्यातील त्यांच्या प्रमाणे ढिंग्या आखणारे अनेक स्ट्रेटजिक शांत दुरचित्रवाहिनीत आपले तोंड घालून बसल्याचे चित्र समोर येत आहे.

एक वरवर नजर टाकली की किती पक्ष आणि आघाड्याा सध्या महाराष्ट्रात आहेत, तरी त्याची कल्पना येईल. दोन महत्त्वाच्या आघाड्या आहेत. एक, भाजपाप्रणित महायुती आणि दुसरी, काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी. पण इथल्या दोन महत्त्वाच्या दोन पक्षांचे तुकडे झाले आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांमध्ये विभागली गेली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये विभागली गेली आहे. यातले एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुतीत गेले आहेत, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आहे. पण एवढेच पक्ष काही महाराष्ट्रात नाहीत. राज ठाकरेंचा ‘मनसे‘, प्रकाश आंबेडकरांची ‘वंचित बहुजन आघाडी‘, काही भागात प्रभाव असलेली ‘एम आय एम‘ आणि सोबतच एक-दोन जागांवर प्रभाव असलेले अनेक छोटेमोठे पक्ष आपले महत्त्व राखून आहेत. महाराष्ट्राचे गणित, जागावाटपात कसे सोडवत आहेत हा सगळ्यांनाच चक्रावून टाकणारा प्रश्न आज आहे. याचे उत्तर ना राजकीय पक्ष ना नेते ना उमेदवार तर सोडाच पण राजकीय विश्लेषक तज्ज्ञही संभ्रमात आहेत.

जागा आणि वाद
नाशिक : शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासह एकनाथ शिंदे गटाने या जागेवर दावा केला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमधून उभे करायचे आहे.
अमरावती : विद्यमान खासदार आणि भाजपचे नवे सदस्य नवनीत राणा यांना भाजपने अमरावतीसाठी रिंगणात उतरवले असून अनेक मित्रपक्षांना नाराज केले आहे. महायुतीचे सहयोगी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी त्यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे मात्र तीव्र नाराजी असलेले माजी खासदार आनंदराव अडसूळांनी सकाळी बंडखोरीचा विषय बोलून दाखविला आणि दुपारी राणा यांना पाठिंबा जाहीर केला.

बारामती : पवारांचा बालेकिल्ला असलेल्या साखरसमृद्ध बारामतीत शरद पवार यांच्या गटातील विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे आव्हान आहे. पवार यांच्या उमेदवारीला शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आव्हान दिले होते, अनेक चर्चेनंतर शिवतारे यांनी अपक्ष उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिर्डी : अनुसूचित जातीसाठी राखीव जागा. शिवसेनेने सदाशिव लोखंडे यांना ठाकरे गटाचे शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा सामना करण्यासाठी आधीच मैदानात उतरवले आहे, ज्यांनी सेनेतून भाजपमध्ये उडी घेतली होती.

प्रत्यक्ष अंदाज बांधणे कठीण
राज्यातील एकूण बंडखोरी, पक्षांतर आणि पाठिंबे बघता मतदानाच्या निकालापर्यंत कोण निवडून येणार याची उत्कंठता लागून आहे. दरम्यान यावेळी ठामपणे अमूक उमेदवार निवडून येऊ शकतो हे ठामपणे सांगता येत नसल्याचे राज्यात काही ठिकाणचे चित्र असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवरून राजकीय विश्लेषकांनी एकमतला दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR