29.8 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeसोलापूरपंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे एकाच दिवशी सोलापुरात

पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे एकाच दिवशी सोलापुरात

सोलापूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सोलापुरात जाहीर सभा होणार आहे. काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा ३० एप्रिलऐवजी २९ एप्रिल रोजी सोलापुरात होणार असल्याचे काँग्रेस पदाधिका-यांनी सांगितले.

माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढाई होत आहे. महाआघाडी आणि महायुतीमधील नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी असल्याचे भाजप नेते जाहीर सभांमधून सांगत आहेत. भाजपची मदार मोदींच्या सभेवर असल्याचे नेते सांगतात. पंतप्रधान मोदी यांची सोमवारी सकाळी होम मैदानावर सभा होणार आहे. भाजप नेत्यांची बुधवारी सभेचा मंच उभारण्याची तयारी सुरू केली होती. उध्दव ठाकरे यांची सभा ३० एप्रिल रोजी होणार आहेत. यात बदल झाला आहे. ही सभा २९ एप्रिल रोजी संध्याकाळी कर्णिक नगर येथील मैदानावर होईल.

सिध्दरामय्या, रेवंत रेड्डीही येणार
काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या दोन सभा शनिवारी होणार आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे आणि कुंभारी येथे या सभा होतील. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही पूर्व भागात सभा घेणार आहेत. त्यांची तारीख निश्चित झालेली नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांचा सोलापुरात रोड शो व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR