40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeराष्ट्रीयतामिळनाडूत राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची घेतली झडती

तामिळनाडूत राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची घेतली झडती

वायनाड : तामिळनाडूतील निलगिरीमध्ये आज निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेतली. राहुल केरळमधील त्यांच्या संसदीय मतदारसंघ वायनाड येथे प्रचारासाठी जात होते, त्यावेळी निवडणूक अधिका-यांनी पोलिसांसह राहुल यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेतली. राहुल गांधी वायनाडमधून दुस-यांदा निवडणूक लढवत आहेत.

आज राहुल गांधी वायनाड मध्ये सार्वजनिक रॅली काढणार असून, अनेक प्रचार सभाही घेणार आहेत.वायनाडकडे जाताना राहुल यांनी तामिळनाडूच्या सीमावर्ती भागातील निलगिरी जिल्ह्यातील कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यानंतर ते रस्त्याने केरळमधील सुलतान बथेरी येथे पोहोचले. येथे राहुल गांधींनी खुल्या गाडीमधून रोड शो करून लोकांचे अभिवादन स्वीकारले. त्यांच्या ‘रोड शो’ला हजारोंची उपस्थिती होती. वायनाड मतदारसंघात त्यांचा सामना सीपीआय नेत्या अ‍ॅनी राजा आणि भाजपचे उमेदवार सुरेंद्रन यांच्याशी होणार आहे.

आमची लढाई आरएसएसच्या विरोधात – राहुल गांधी
रोड शो दरम्यान राहुल यांनी तेथे उपस्थित लोकांना संबोधितही केले. यावेळी राहुल म्हणाले की, आमची लढाई प्रामुख्याने आरएसएसच्या विचारधारे विरोधात आहे. यावेळी त्यांनी मोदींवरही प्रहार केला. पंतप्रधान मोदींना एक राष्ट्र, एक निवडणूक, एक नेता, एक भाषा हवी आहे. तुमची भाषा हिंदीपेक्षा निकृष्ट असल्याचे केरळच्या लोकांना सांगण्यात येते हे अपमानास्पद आहे. तर भारतात एकच नेता असावा असे म्हणणे म्हणजे देशातील सर्व तरुणांचा अपमान करण्यासारखे आहे, असा आरोपही राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR