30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरदुहेरी हत्याकांडातील संशयितांना पोलिस कोठडी

दुहेरी हत्याकांडातील संशयितांना पोलिस कोठडी

दक्षीण सोलापूर : बरुर हद्दीत अनैतिक संबंधातून झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित पाचही आरोपींना मंद्रूप पोलीसांनीएकास मध्यरात्री तर चौघांना पहाटे पकडले. सर्वांना अटक करून सोलापूरच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांना पाच दीवसांची पोलीस कोठडी मीळाली.या घटनेत श्रीकांत अनिल नरोटे (वय २२ ) व अनिता चनबसप्पा सलगरे (वय ३५, रा. सलगरे वस्ती, बरुर) या दोघांचा खून झाला होता. घटनास्थळी भेट देऊन मंद्रुप पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत घुले, उपनिरीक्षक करपे यांनी तपासाची चक्रे फिरविली. मुख्य संशयित आरोपी चनबसप्पा सलगरे याला सोलापुरातून ताब्यात घेतले.

त्यानंतर इतर चार संशयितांना बरुर परिसरातून एका वस्तीवरून ताब्यात घेतले. या दुहेरी हत्याकांडातील चनबसप्पा देवाच्या सलगरे (वय ४०), कल्लाप्पा सिद्धाप्पा सलगरे (वय ३७), लक्ष्मण चंदू सलगरे (वय २८), उमेश सुरेश सलगरे (वय ३१) नागप्पा उर्फ नागनाथ रामप्पा माने (वय ५२) रा.सर्वजण (सलगरे वस्ती, बरूर, ता. द. सोलापूर) असे पोलिस कोठडी मिळालेल्या पाचही संशयित आरोपींची नावे आहेत, या सर्व पाचही संशयितांना पोलिसांनी काही तासांतच अटक केली

घटनेची पार्श्वभूमी सलगरे वस्ती येथे राहणाऱ्या अनिता सलगरे हिच्याशी नांदणीच्या श्रीकांत नरोटे याच्याशी अनैतिक संबंध होते. हे अनैतिक प्रेमसंबंध तोडण्याबाबत दोन्ही कुटुंबांनी दोघांनाही समजावून सांगितले होत. मात्र त्यांच्यात काही फरक पडला नाही. सलगरे यांच्या द्राक्षबागेत अनिता ही काम करत होती त्यावेळी श्रीकांत हा तिथे आला. दोघांना शेतात एकत्र पाहून चनबसप्पा संतापला, त्यानंतर त्याने जवळच असलेल्या वस्तीवर जाऊन कुर्‍हाड आणली. रागाच्या भरात श्रीकांत व पत्नी अनिता हिच्या मानेवर कुर्‍हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.

जवळच वस्ती असल्याने श्रीकांतचे वडील अनिल नरोटे धावत घटनास्थळी आले. तेव्हा श्रीकांत व अनिता हे दोघेही गंभीर जखमी झाल्याने तडफडत होते.त्यांना दवाखान्यात हलविण्याची त्यांनी विनंती केली. मात्र सलगरे कुटुंबातील लोकांनी विरोध केला. यामुळे काही वेळात त्या दोघांचा मृत्यु झाला असे नरोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR