39.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeपरभणीतपोवन, नरसापूर, पुणे एक्सप्रेस धावणार उशीराने

तपोवन, नरसापूर, पुणे एक्सप्रेस धावणार उशीराने

परभणी : परभणी ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गावरील सेलू ते ढेंगळी पिंपळगाव दरम्यान ६ आणि ९ एप्रिल रोजी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे तपोवन, नरसापूर, पुणे एक्सप्रेस उशीराने धावणार असल्याची माहिती नांदेड रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

सेलू ते ढेंगळी पिंपळगाव दरम्यान रेल्वे कामासाठी दि.६ आणि ९ एप्रिल रोजी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक १७६१७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते हजूर साहिब नांदेड तपोवन एक्स्प्रेस जालना ते सेलू दरम्यान १३५ मिनिटे उशिरा धावेल. गाडी क्रमांक १२७८८ नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस जालना ते सेलू दरम्यान १०५ मिनिटे उशिरा धावेल. गाडी क्रमांक १७२३२ नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस जालना त सेलू दरम्यान १०५ मिनिटे उशिरा धावेल.

गाडी क्रमांक १७६३० नांदेड ते पुणे एक्स्प्रेस नांदेड-मानवत रोड दरम्यान ९० मिनिटे उशिरा धावेल. गाडी क्रमांक १७६६१ काचीगुडा-रोटेगाव एक्स्प्रेस २४० मिनिटे उशिरा धावेल. तसेच गाडी क्रमांक १७६५० औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस दि.६ आणि ९ एप्रिल रोजी औरंगाबाद येथून १२५ मिनिटे उशिरा सुटेल अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालय नांदेड विभागाने दिली आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR