38.7 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रसंविधान गरिबांचा, आदिवासींचा, दलितांचा आवाज

संविधान गरिबांचा, आदिवासींचा, दलितांचा आवाज

अमरावती : संविधान गरिबांचा, आदिवासींचा, दलितांचा आवाज आहे. संविधानाला कोणतीही शक्ती बदलू शकत नाही. कोण संविधान बदलतो, हे आम्ही बघतोच. नरेंद्र मोदींनी मागील दहा वर्षात २२-२५ लोकांसाठी सर्वकाही केलं आहे. देशातील ७० कोटी लोकांकडे जेव्हढा पैसा आहे, तेव्हढाच पैसा हिंदुस्थानच्या २२ लोकांकडे आहे. २२ लोकांसाठी नोटबंदी केली. जीएसटी या २२ लोकांसाठी केलं. नरेंद्र मोदींनी २५-३० लोकांचं १६ लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं आहे. मोदींनी शेतकरी, दलित, विद्यार्थी, मागासवर्गीयांचा किती कर्ज माफ केलं, मोदींनी हिंदुस्थानच्या गरिबांचा एक रुपयाही माफ केलं नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते अमरावतीत बळवंत वानखेडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

राहुल गांधी जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, मोदी म्हणतात, इंडिया आघाडी संविधानाचं आणि लोकशाहीच रक्षण करत आहेत. तर दसुरीकडे नरेंद्र मोदी, भाजप, आरएसएस संविधान आणि लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे त्यांचं लक्ष्य आहे. यांच्या एका खासदाराने म्हटलं, आम्ही निवडणूक जिंकलो, तर आम्ही संविधान बदलू. जगातील कोणतीही शक्ती आमच्या संविधानाला बदलू शकत नाही.

हे लोक स्वत:ला काय समजतात. संविधान देशाचा आवाज आहे. आम्ही गरिबांचं सरकार चालवतो. त्यांनी २२ अरबपतींना मदत केली. त्यांनी अरबपती तयार केले आहेत. आम्ही करोड लखपती तयार करणार आहोत. आमचा जाहीरनामा वाचा. महालक्ष्मी योजनेत प्रत्येक गरिब कुटुंबाची यादी आम्ही बनवणार आहोत.

देशात कोट्यावधी लोक दारिद्य्ररेषेखाली आहेत. त्यांची यादी आम्ही तयार करणार आहोत. प्रत्येक गरिब कुटुंबातून एका महिलेचं नाव घेतलं जाईल. त्यानंतर काँग्रेस-इंडिया आघाडीचं सरकार प्रत्येक वर्ष त्यांच्या बँक खात्यात एक लाख रुपये जमा करणार. कोट्यावधी महिलांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्यात ८५०० रुपये जमा होतील.

तुम्ही २५ अरबपती तयार करत असाल, तर आम्ही करोडो लखपती बनवू. पहिल्या लिस्टमध्ये सर्वात गरिब कुटुंबाला आम्ही एक लाख रुपये देणार आहोत. नरेंद्र मोदींनी तरुणांना त्रास दिला. २ कोटी तरुणांना रोजगार देईल. त्यानंतर नोटबंदी केली. चुकीची जीएसटी लागू केली. संपूर्ण देशात बेरोजगारी सुरु केली. सर्वात जास्त बेरोजगारी आज देशात आहे.

कोट्यावधी तरुण नोकरीसाठी रस्त्यावर फिरतात. श्रीमंतांची मुलं अप्रेन्टिशीप करतात. मार्केटमध्ये नोकरी येण्याआधी श्रीमंत लोक सहा महिनेकिंवा वर्षासाठी आपल्या मुलांना अप्रेन्टिशीप देतात. हे लोक त्यांच्या मुलांना याप्रकारे ट्रेंिनग देतात. पण ही सुविधा हिंदुस्थानातील कोट्यावधी बेरोजगार मुलांना मिळत नाही. ही मुलं अनेकदा विनंती करतात, पण नरेंद्र मोदी त्यांचं ऐकत नाही. जी सुविधा श्रीमंत लोक त्यांच्या मुलांना देतात, तीच सुविधा आम्ही हिंदुस्थानच्या प्रत्येक गरिब मुलाल देणार आहोत.

सर्व पदवीधर, डिप्लोमा होल्डर्सला सर्वांना हा अधिकार दिला जाईल. तुम्हाला नोकरी मिळणार आणि ट्रेंिनगही मिळणार. फक्त एव्हढच नाही, तर बँक खात्यात तुम्हाला एक लाख रुपये आमचं सरकार देईल. नरेंद्र मोदींनी दहा वर्षात तुमचं कर्ज माफ केलं नाही, पण आमचं सरकार आल्यावर शेतक-यांचं कर्ज माफ केलं जाईल, असं आश्वासनही राहुल गांधी यांनी जनतेला दिलं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR