34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeलातूरलातूरच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला पाठींबा द्या

लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला पाठींबा द्या

लातूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाचा भर सकारात्मक, विकासात्मक राजकारणावर आहे. त्यामुळेच आज आपण लातूरचा विकास अनुभवत आहोत. लातूरचा हा विकास, विचार आणि नेतृत्व पुढे नेण्यासाठी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे सर्वांनी भक्कमपणे उभे रहावे आणि आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन ‘लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी गुरुवारी (दि. १८) येथे केले.
लातूर तालुक्यातील सामनगाव येथे गुरुंिलंग बुलबुले, चिखुर्डा येथे श्री. रवींद्र काळे आणि साखरा येथे महादेव गोडसे पाटील, अंकोली येथे महादेव मुळे आणिचिंचोलीराव वाडी येथे गुरुनाथ गवळी यांच्या निवासस्थानी स्रेहभेट व संवाद बैठका घेऊन आमदार धिरज देशमुख यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला. उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. उष्णतेची लाट सर्वत्र पसरली आहे. या रखरखत्या उन्हाचा सामना करीत डॉ. काळगे यांच्या विजयासाठी आमदार धिरज देशमुख यांच्या स्रेहभेटी  आणि बैठकांचे सत्र नियमित सुरू आहे.
आमदार धिरज देशमुख म्हणाले की, लातूरच्या विकासात शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख, दिलीपराव देशमुख यांचे योगदान राहिले आहे. त्यांनी त्या काळात संघर्ष करून येथे विकासाची मुहूर्तमेढ रोवली. या सकारात्मक, विकासात्मक राजकारणाच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. लातूर व मराठवाड्याला नेहमी लहरी हवामानाचा फटका बसतो आहे. त्यामुळे येथील शेतक-यासाठी आपत्कालीन धोरण ठरवून वेळेत मदत करणे आवश्यक असते. भाजप सरकारच्या धोरणांमुळे आपत्तीच्या काळात शेतक-याांना पीकविमा भरपाई मिळत नाही. शासनाची मदत, अनुदानही वेळेत मिळत नाही, याबाबत आमदार धिरज देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली.
घराती दैनंदिन गरजा, शेती औजारे, खते, बी-बियाणे तसेच बिस्कीटांपासून वह्या, पुस्तके, पेन्सिलवर भाजप सरकार भरमसाठ जीएसटी आकारत आहे. शेतक-यांंना हक्काचा हमीभाव, शिक्षीतांना हक्काचा रोजगार देण्याऐवजी मोफत धान्य, २ हजारांचा निधी दिला जातो. सरकारकडून होणारी ही फसवणूक आहे. महागाईचा वाढता दर, बेरोजगारांची वाढती संख्या, महिलांची असुरक्षितता, शेतीचे बिघडलेले अर्थकारण यावर एकच पर्याय आहे, तो म्हणजे देशात काँग्रेस, इंडिया आघाडी सरकार सत्तेत आणणे, असे आमदार धिरज देशमुख यांनी सांगितले. यावेळी अनुप शेळके, रवींद्र काळे, सुभाष घोडके, गोंिवद बोराडे, भैरवनाथ सव्वासे, अनंत बारबोले, गुरुनाथ गवळी, श्रीनिवास शेळके, सचिन सूर्यवंशी, नरंिसग बुलबुले, शिवराज बुलबुले, ंिलबराज मुळे यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR