33.2 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरसोलापूरात भाजीपाल्याचे दर स्थीर

सोलापूरात भाजीपाल्याचे दर स्थीर

सोलापूर : उन्हाळा सुरू होताच भाजीपाल्याचे दर कडाडतात, असा ग्राहकांचा आजवरचा अनुभव आहे. यंदा मात्र भाजीपाल्याची आवक वाढली असल्याने दरवर्षीच्या तुलनेत प्रत्येक भाजीचे दर १० ते १५ रुपयांनी पडले आहेत. उन्हाळा म्हटला की भाजीपाला, दुधाचे उत्पादन घटते. यंदा मात्र कडक उन्हातही प्रथमच भाजीपाला आवाक्यात आहे. विवाह तिथींमुळे फळभाज्यांना मागणी असूनही दर फारसे वधारले नाहीत.

बाजारात आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेवगा शेंगा, लसूण आदी वगळता जवळपास सर्व भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यात मेथीसह पालक, कोथिंबीरचे भाव प्रचंड प्रमाणात घसरले असून कवडीमोल भावात त्याची विक्री सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात भाज्यांचे भाव गडगडल्याने गृहिणींना ‘कशाची भाजी करायची’ ही समस्या निदान यावर्षी तरी भासणार नाही असे दिसते. मात्र, भाजीपाला उत्पादकांना अत्यंत कमी मोबदला मिळत असल्याने लागवडीचा खर्चही निघत नाही. आजकाल बाजारपेठेत भाजी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने दोन्ही वेळच्या जेवणात ताज्या भाज्यांची मेजवानी असली तरी यामुळे खिशालाही झळ सोसावी लागत आहे.

तसेच हापूस, लंगडा, केसरी, पायरी, बदामी आणि गावरान आंब्याची विक्री वाढली आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक ठोक बाजारात होत आहे. किरकोळ बाजारातही पालेभाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहे. मेथी व शेपू पंधरा रुपये पेंढी, तर कोथिंबीर, पालक, चुका १० रुपयांना मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.दरवर्षी उन्हाळ्यात भाज्यांची दरवाढ होते, कडक उन्हाने भाज्यांचे उत्पादन कमी येते त्यामुळे आवक घटते, परिणामी भाज्या महाग होण्यास सुरुवात होते. पुढील पंधरा दिवसांत बाजारात भाज्याचे आवक कमी होऊन दर वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR