33.2 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरबनावट दस्ताद्वारे व्यवहार करून जमिनीची विक्री

बनावट दस्ताद्वारे व्यवहार करून जमिनीची विक्री

सोलापूर : बनावट दस्तऐवज तयार करून, जागा मालक आणि शासनाची फसवणूक करून त्रयस्ताला जमिनी विक्रीचा व्यवहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा व्यवहार व नोंद दक्षिण तहसील व सह दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात १४ जून १९९० ते ५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडल्याची तक्रार सलीम गफूर जमादार (रा. ४९, रा. अशोक चौक, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) यांनी केली आहे.

याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. गुलाब बाबूमियाँ काखंडीकर, पवेश गुलाम काखंडीकर (दोघे रा. बेगमपेठ,सोलापूर), ओगसिद्ध भीमाशंकर केवटे, मळसिद्ध भीमाशंकर केवटे, धोंडिबा भीमाशंकर केवटे (रा. मंद्रूप, ता. द. सोलापूर), अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीच्या मालकीची डी व सब डी सोलापूरपैकी दक्षिण तालुका मंद्रूप ग्रामपंचायत हद्दीतील जमीन गट नं. १०७७/ ब नवीन सर्व्हे नं. ९९२/२, प्लॉट नं. ११४, क्षेत्र ११०२.८७ चौ.मी. या मिळकतीचे नमूद चौघांनी बनावट दस्त तयार करून संगनमताने फिर्यादीच्या परस्पर विक्री केली. यात फिर्यादी व शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, पहिला तपास फौजदार व्हट्टे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR