Homeलातूरमोरवड येथे शेतक-यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मोरवड येथे शेतक-यांचा आत्महत्येचा प्रयत्न

रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील मोरवड  येथून जाणा-या  शक्तीपिठ महामार्ग म्हणजेच  पवणार ते पत्रा देवी शिग्रसंचार द्रुतगती महामार्गासाठी लागणा-या जमीनीची  मोजनी करण्यासाठी रेणापूर महसूल व भूमि अभिलेख विभाग, मोनार्क प्रायव्हेट  लिमिटेड कंपनीचे अधिकारी व कर्मचारी हे मोरवड येथे मंगळवारी दि १० रोजी गेले असता संबंधित शेतक-यांनी  विरोध करीत  आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता  मोजणीसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचा-यांनी  कडता पाय घेतला.
रेणापूर तालुक्यातील चाडगाव, मोरवड, भोकरंबा, मोटेगाव या गावातील शेतक-यांच्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग म्हणजेच  पवणार ते पत्रा देवी शिग्रसंचार द्रुतगती महामार्ग विशेष क्रमांक १०  असा महामार्ग करण्याचा राज्य सरकारने घाट घातला आहे. मंगळवार दि . १० रोजी  रेणापूर येथील महसूल, भूमि अभिलेख विभागाचे व मोनार्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अधिकारी कर्मचारी हे  मोरवड येथे महामार्गासाठी लागणारी जमिनीची मोजणी करण्यासाठी आले होते. आलेल्या  अधिकारी व कर्मचा-यांनी शेतक-यांचे म्हणणे ऐकून न घेता जमिनीची मोजनी करण्यास सुरुवात केली होती.
तेव्हा या मोजणीस शेतक-यांनी विरोध केला मात्र यास दाद दिली नाही तेव्हा त्या भागातील शेतक-यांनी गळफास व विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता मोजणी करण्यासाठी गेलेले अधिकारी व कर्मचारी यांनी प्रसंगावधान राखत हे प्रकरण आपल्या अंगाशी येणार असल्याचे पाहून मोजणी न करताच माघारी परतले . यावेळी शक्तीपीठ महामार्ग विरोधीबाधित शेतकरी समितीचे गजेंद्र येळकर, सुधीर खुरसाले,  राहूल  माने, संभाजी  हाके, निळकंठ भिसे, अ‍ॅड. दिलीपराव कुलकर्णी, प्रकाश चव्हाण,  कल्याण देशमुख, उत्तमराव जाधव, संजय माने, युवराज माने, गणेश माने, महेश माने, दशरथ माने, विश्वंभर जाधव, मजुरखान पठाण, निवृत्ती पठाण आदी शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR