रेणापूर : प्रतिनिधी
येथील शाळेच्या व मेन रोडच्या लगत असलेला डी.पी तात्काळ हटवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रेणापूर शहर काँग्रेसच्या वतीने महावितरण कंपनीचे उपअभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. येथील श्रीराम विद्यालय समोरील मेन रोडलगत उघडा धोकादायक डी.पी असल्याने शाळेतील लहान मुले, मुली तसेच नागरिकांना डी.पीचा धोका होत असल्याचे निर्दशनास आले आहे. अनेकदा येथील डी.पीस शॉर्टसर्किट होत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे असा धोकादायक डी.पी.शाळेपासून हटविण्यात यावा जेणे करून भविष्यात मोठी हानी होणार नाही यासाठी सदरील डी.पी. काढण्यात यावा अन्यथा रेणापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महावितरण कार्यालयसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर प्रमोद कापसे, नितीन मोटेगावकर, गटनेते गजेंद्र चव्हाण, सचिन मोटेगावकर, पद्मसिंह पाटील, अमर वाकडे, रहिम पठाण, सचिन पुंडलिकराव इगे, रोहित गिरी, विलास राठोड, सुरज वंगाटे, दग्विजय पाटील, शरद कातळे, धनराज गिरी, आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

