33.2 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरकलिंगड व खरबूज उत्पादकांना दराच्या बाबतीत हंगाम गोड

कलिंगड व खरबूज उत्पादकांना दराच्या बाबतीत हंगाम गोड

उ. सोलापूर : उन्हाळा हंगामातच मुस्लिम बांधवांचा पवित्र असा स्मजान महिन्यातील उपवासांचा योग जुळून आल्यामुळे यावर्षी कलिंगड व खरबूज उत्पादकांना दराच्या बाबतीत हंगाम गोड ठरला आहे. मागणी असल्याने बाजारात आवक वाढली असतानाही दर टिकून आहेत. उन्हाळ्यात फळांची मागणी वाढते, यामुळे कलिंगड व टरबूज या पाणीदार फळांची मागणी विशेषतः जास्त असते. यामुळे रब्बी हंगामाच्या अखेरीस कालिंगड व खरबुजाचे अत्पादन घेण्याकडे शेतकयांचा कल असतो. मात्र काही वर्षामध्ये कलिंगड व खरबूज लागवडीत मोल्या प्रमाणात आधुनिक तंत्राचा वापर सुरू झाला आहे.

ठिबक सिंचन, प्लास्टीक आच्छादन त्याचबरोबर खरबूज सारख्या पिकात क्रॉप कव्हर
सारख्या प्रयोगाचा वापर केल्याने उत्पादनात फार मोठी वाढ झाली आहे. साहजिकच उन्हाळ्यात दर वाढण्याऐवजी दर घसरतात असा चार-पाच वर्षांचा अनुभव आहे. यावळी मात्र सध्याच्या स्थितीला बाजारात कलिंगड व खरबुजांचे भाव टिकून आहेत. मुस्लिम बांधव रमजान महिन्यात उपवास करतात. हा उपवास सोडताना फळांचा वापर केला जातो.

दिवसभर उपवासाच्या कालावधीत शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहावे यासाठी मुस्लिम बांधव कलिंगड व खरबूज याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. साहजिकच रमजान महिन्यात या फळांना मोठी मागणी असते. यामुळे या वर्षात कलिंगड व खरबूज उत्पादक शेतकर्‍यांसाठी चित्र दिलासादायक आहे. यावर्षी अवर्षणामुळे कलिंगड व खरबुजांची लागवड मर्यादित असल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली, यामुळे यावर्षी बाजारात कलिंगड व खरबुजांचे दर टिकून आहेत.

खरबूज शेती अत्यंत खर्चिक व जोखमीची म्हणून ओळखली जाते. यामुळे खरबुजाला अपेक्षित दर न मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. चालू वर्षात उच्च प्रतीच्या खरबुजाला ४० ते ४५ रुपये प्रति किलो तर दुय्यम दर्जाच्या खरबुजाला २० ते ३० रुपये प्रति किलो इतका दर मिळाला आहे. तर कलिंगडाला यावर्षी प्रति किलो १८ ते २० रुपये इतका दर मिळाला आहे. या दरामुळे चालू हंगाम शेतकऱ्यांसाठी गोडच झाला असे म्हणावे लागेल. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये बाजारात कलिंगड व खरबुजाची आवक जास्त होते. यामुळे अपेक्षित दर मिळत नाही. यावर्षी मात्र समाधानकारक दर मिळत आहेत. कांदा उत्पादन मातीतं गेले मात्र कलिंगड पिकाने मला सावरले असे मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील शेतकरी विशाल बिराजदार यांनी सांगीतले.

यावर्षी पहिल्यांदाच कलिंगडाची लागवड केली, बाजारात दर टिकून राहिल्यामुळे माझ्या हातात उत्पादन खर्च वजा जाता समाधानकारक रक्कम शिल्लक राहिली. इतर सर्व पिकांनी माझी यावर्षी निराशा केली आहे. असे गुळवंची तालुका उत्तर सोलापूर येथील शेतकरी सतीश नवगिरे यांनी सांगीतले. दरवर्षी कलिंगड व खरबूज लागवड करतो, गेल्या होते. यावर्षी स्थानिक बाजारपेठेतच समाधानकारक दर असल्यामुळे कलिंगड व खरबुजाची विक्री सोलापूर शहरातच केली.असे बंकलगी तालुका दक्षिण सोलापूर येथील शेतकरी मनोज पाटील यांनी सांगीतले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR