Homeलातूरजळकोटच्या पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा

जळकोटच्या पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा

जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मध्ये २०१७ ची पुनरावृत्ती झाली आहे. या निवडणुकीत जळकोट तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटापैकी दोन जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले तर एका जिल्हा परिषद गटावर अपक्ष उमेदवार विजयी झाले तर पंचायत समितीवर सलग दुस-यांदा काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. सहा पंचायत समिती गणापैकी चार पंचायत समिती गणामधून काँग्रेसचे उमेदवार हे विजयी झाले आहेत. यामुळे पंचायत समितीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे .
माळहिप्परगा जिल्हा परिषद गटामधून काँग्रेस पक्षाच्या सौ. नागेश्वरी केंद्रे यांनी भाजपाच्या रोहिणीताई केंद्रे यांचा तब्बल ३०६० मतांनी पराभव केला. या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारास  ८१९१ मते मिळाली तर भाजपाच्या उमेदवारास ५१३९ मते मिळाली  तर शिवसेनेच्या उमेदवारास केवळ ३३४ मते मिळाली व अपक्षाने या ठिकाणी १४८ मते मिळवली. गुत्ती जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसच्या उमेदवार शांताबाई लक्ष्मण अदावळे या तब्बल २२७३ मतांनी विजयी झाल्या, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वेदिका अदावळे यांचा पराभव केला. काँग्रेसच्या उमेदवाराला ७०८६ मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या उमेदवारास ४८१३ मते मिळाली तर शिवसेनेच्या उमेदवारास ११२६ मते मिळाली. अतिशय सामान्य असलेल्या शांताबाई आदावळे यांना मतदारांनी विजयी केले .
  वांजरवाडा जिल्हा परिषद मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मपाल देवशेट्टे हे विजयी झाले . त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल चव्हाण यांचा ४१५ मतांनी पराभव केला. येथे काँग्रेसच्या उमेदवाराला २७३१ मते मिळाली व शिवसेनेचे उमेदवारास ८७४ मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या उमेदवारास १७१९ मते मिळाली. त्यांनी २०१७ च्या निवडणुकीतही या ठिकाणी धर्मपाल देवशेट्टे यांनी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवली होती परंतु त्यांचा पराभव झाला होता.
जळकोट पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे तालुक्यामध्ये ४ जागांवर काँग्रेस विजयी झालेली आहे तर दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट विजयी झाला आहे .
   माळहिप्परगा पंचायत समिती गणामधून काँग्रेसचे राजेश अशोक केंद्रे यांनी भाजपाचे प्रशांत चोले यांचा ३३५ मतांनी पराभव केला. या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला ३४२ मते मिळाली तर भाजपाच्या उमेदवाराला ३१०७ मते मिळाली. मंगरूळ गणामधून काँग्रेसच्या सुनिता कोसंबे या विजयी झाल्या. त्यांनी प्रतस्पिर्धी भाजपाचे उमेदवार शामलाताई व्यंकटराव कवटाळे यांचा तब्बल १५२५ मतांनी पराभव केला. या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारास ३६२६ मतदान मिळाले तर भाजपाच्या उमेदवार यांना २१०१ मतदान मिळाले या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराला ११८३ मतदान मिळाले . मंगरूळ गणामधून दुस-यांदा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे.
गुत्ती पंचायत समिती गणामधून काँग्रेसच्या उमेदवार मीरा सूर्यवंशी या विजयी झाल्या आहेत त्यांनी प्रतस्पिर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा मोरे यांचा ३३६ मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी ३११५ मते मिळाली तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार यांना २७७९ ते मिळाली. गुत्ती पंचायत समिती गणावर पहिल्यांदाच काँग्रेसचा झेंडा फडकला. अतनूर पंचायत समिती गणातून काँग्रेसचे उमेदवार माधव वाघमारे हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विनोद कांबळे यांचा २६५ मतांनी पराभव केला. या ठिकाणी माधव वाघमारे यांना २४९२ मते मिळाली तर विनोद कांबळे यांना २२२७ मते मिळाली. या ठिकाणी शिवसेनेचे रवी गोरखे यांना ११०६ मते मिळाली.
वांजरवाडा पंचायत समिती गणातून  राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकांता ताकबीडे या विजयी झाल्या काँग्रेसचे अंजू कदम यांचा ९०३ मतांनी पराभव केला . या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास २७८४ मते मिळाली तर काँग्रेसच्या उमेदवारास १८८१ मते मिळाली. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे चरचंद्र पवार गटाचा उमेदवार हा तिस-या क्रमांकावर राहिला. जगळपूर पंचायत समिती गणातही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार विजयी झाला. या ठिकाणी राहुल झोले हे विजयी झाले . त्यांनी काँग्रेसचे उमेदवार वंदना माधव केसाळे यांचा ११४७ मतांनी पराभव केला तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे कमलाकर पन्हाळे यांना १६४३ मते मिळाली

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR