39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडदोन ठिकाणी घरफोडी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

दोन ठिकाणी घरफोडी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

नांदेड: प्रतिनिधी
विमानतळ व तामसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास झाल्याची घटना दि.१५ व १६मार्च रोजी घडली. तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारकडवाडी ता. हदगाव येथे शेतामध्ये हळद शिजवण्यासाठी घरी कुलूप कोडी लावून सर्वजण गेले असता याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून पेटीत ठेवलेले नगदी १ लाख ५० हजार व सात ग्रॅम सोन्याचे फुल ३५ हजार रुपये असा एकूण एक लाख ८५ हजाररांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

याप्रकरणी देवराव फुलसिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून हादगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोद करण्यात आला आहे. तर दुस-्या घटनेत विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जवाहर नगर परिसरात घराला कुलूप कोंडी असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून कपाटातील दागिने व नगदी ३० हजार असा एकूण ७० हजाराचा मुद्देमाल कंपास केला आहे. या प्रकरणी सुरेश चंद्रकांत किडनीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR