34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeनांदेडपंतप्रधान मोदी यांची उद्या जाहीर सभा

पंतप्रधान मोदी यांची उद्या जाहीर सभा

नांदेड : प्रतिनिधी
भाजप-महायुतीचे नांदेड लोकसभेचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा दि. २० एप्रिल रोजी सकाळी ९ वा. मोदी ग्राऊंड, शिवरत्न जिवाजी महाले चौक असर्जन रोड, कौठा येथे आयोजित करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी येणारा लाखोंचा जनसमुदाय लक्षात घेता सभास्थळी विशाल सभामंडप व भव्य व्यासपीठ उभारण्यात येत आहे. शिवाय महिलांसाठी विशेष आसन व्यवस्था करण्यात येत असून उन्हाची तीव्रता लक्षात घेता सभास्थळी सुरक्षित आसरा व पाण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह राज्यातील व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. नरसी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विक्रमी जाहीर सभेनंतर नांदेड लोकसभा मंतदारसंघात संपूर्ण भाजपमय वातावरण निर्माण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार असल्यामुळे या सभेसाठी नांदेडवासीय उत्सुक आहेत. सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजप-महायुतीच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR