34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeनांदेडरुग्णालयातील ‘एसी’ रूमला आग

रुग्णालयातील ‘एसी’ रूमला आग

नांदेड: शहरातील कलामंदीर डॉक्टर लाईन भागात एका रुग्णालयातील वातानुकुलित रुमला आग लागली. अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ आग विझविल्यामुळे पुढील अनार्थ टळला. सदर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या दरम्यान घडली.

शहरातील कलामंदीर डॉक्टर लाईन भागात खमर हॉस्पिटल येथे एका वातानुकुलित रूमला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. १८ एप्रिल रोजी दुपारी ३ च्या दरम्यान घटना घडली. आग लागताच याची माहिती अग्निशमनच्या पथकाला देण्यात आली. अग्निशामन अधिकारी दासरे, गायकवाड यांनी तात्काळ वाहन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. आगीमध्ये खमर हॉस्पिटलच्या वातानुकुलित रूममधील साहित्य बेड, गादी व साहित्य जळाले. नुकसान किती झाले हे अद्याप समजले नाही. अग्निशामन दलाच्या पथकाने आग तात्काळ विझविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. डॉक्टर लाईन परिसरामध्ये लागल्यामुळे आगीमुळे नागरिकांची धावपळ उडाली. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR