34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeनांदेडमतदार नागरिकांना हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये सूट

मतदार नागरिकांना हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये सूट

नांदेड : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या पार्श्वभुमीवर शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कक्षा अंतर्गत दि.१८ एप्रिल रोजी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत शहरातील लॉजिंग अँण्ड रेस्टॉरेन्ट असोसिएशनच्या पदाधिका-यां समवेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांची बैठक पार पडली. बोटाला मतदान केल्याची शाई असेल त्यांना शहरातील सर्व लॉजिंग व रेस्टॉरेन्ट मध्ये लॉजिंग शुल्कामध्ये १५% सवलत देण्याचे आश्वासन लॉजिंग अँण्ड रेस्टॉरेन्ट असोसिएशनने दिले.

याप्रसंगी नांदेड शहर लॉजिंग अँण्ड रेस्टॉरेन्ट असोसिएशन तर्फे नागरीकांना मतदानासाठी प्रोत्साहीत करण्याच्या हेतुने नांदेड शहरात दिनांक २६, २७ व २८ एप्रिल २०२४ या तीन दिवसांसाठी ज्या नागरीकांच्या बोटाला मतदान केल्याची शाई असेल त्यांना नांदेड शहरातील सर्व लॉजिंग व रेस्टॉरेन्ट मध्ये लॉजिंग व खान-पानाच्या शुल्कामध्ये १५% सवलत देण्याचे आश्वासन लॉजिंग अँण्ड रेस्टॉरेन्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अखिल गुप्ता यांनी बैठकी दरम्यान दिले आहे. या उपक्रमासाठी मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी लॉजिंग अँण्ड रेस्टॉरेन्ट असोसिएशनच्या सहकायार्बाबत समाधान व्यक्त केले आहे.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादेक, मुख्य स्वच्छता निरीक्षक वसीम तडवी यांची उपस्थित होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR