31.2 C
Latur
Thursday, May 9, 2024
HomeUncategorizedभाजपमधील असंतुष्टांना गळाला लावण्याचा शिंदेंचा प्रयत्न

भाजपमधील असंतुष्टांना गळाला लावण्याचा शिंदेंचा प्रयत्न

रणजीत जोशी
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांची लढत चुरशीची होत असताना प्रचाराबरोबरच राजकीय डावपेचही आखले जात आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपचे दिवंगत माजी खासदार लिंगराज वल्याळ यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या निवासस्थानी घेतलेली धाव आणि त्यावेळी भाजपमधील असंतुष्ट मंडळींशी घेतलेली भेट हा चर्चेचा विषय ठरला आहे.

लिंगराज वल्याळ हे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे पहिले आमदार होते. ते १९९० साली सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. नंतर १९९५ साली पुन्हा दुस-यांदा ते आमदार झाले असता पुढच्याच वर्षी, १९९६ साली मध्यावधी लोकसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी वल्याळ हे भाजपकडून निवडून आले होते. सोलापुरातील भाजपचे ते पहिलेच आमदार आणि पहिलेच खासदार होते. त्यांचे पुत्र नागेश वल्याळ हे भाजपचे नगरसेवक होते. परंतु सध्या ते भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना लिंगराज वल्याळ यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे भवानी पेठेतील घोंगडे वस्तीत वल्याळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.कै.लिंगराज वल्याळ यांच्याविषयी भाजप कार्यकर्त्यांना अतोनात प्रेम आहे.सुशीलकुमार शिंदे यांनी हा दुवा लक्षात घेऊन वल्याळ यांना आदरांजली वाहिली.

यावेळी बीआरएसचे नागेश वल्याळ, भाजपचे प्रभाकर जामगुंडे,सुरेश पाटील अशा भाजपमधील असंतुष्ट मंडळींशी भेट झाली.लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शींदे यांनी फासे टाकण्यास सुरवात केली असून भाजपमधील विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख या आमदारांवर नाराज असणा-या कार्यकर्त्यांना चुचकारण्याचे काम शींदे करत आहेत.विरोधकांना आपलेसे करण्याचे सूशीलकुमारांचे कौशल्य असून ते या कौशल्याचा वापर करत भाजपमधील नाराजांवर गळ टाकत आहेत. गेली दहा वर्षे सत्ता असूनही कार्यकर्त्यांना कोणताही सत्तेची पदे न दील्याने सर्वसामान्य कार्यकर्ते नाराज आहेत. याबरोबर अंतर्गत गटबाजीमुळे अनेक कार्यकर्त्यांचा राजकीय बळी गेला.प्रा.अशोक निंबर्गी,नागेश वल्याळ यांना पक्ष सोडावा लागला. अनेक जुन्या नेत्यांना बाजूला फेकले गेले. परिणामी पक्षाची संघटनात्मक घडी विसकटली गेली.

सातपुते यांना उमेदवारी मीळाल्यावर पहिल्यांदा शहरात आगमन झाल्यावर दोन्ही आमदारांची उपस्थीती स्वागताला नव्हती. सोलापूरात पुर्वी असलेली संघाची पकड भाजपवर राहिली नाही. पुर्वी मुंडे—गडकरी अशा गटांमध्ये विभागलेला भाजप नंतर दोन आमदार देशमुखांच्या गटात विभागला गेला. एकमेकांच्या कार्यकर्त्यांचे पंख छाटण्यात दोन्ही गटांनी धन्यता मानली. या अंतर्गत गटबाजीचा फायदा घेण्याचा सुशीलकुमार शींदे यांचा प्रयत्न आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR