30.7 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeलातूरलातूरच्या बाजारात रसाळ फळांची आवक वाढली

लातूरच्या बाजारात रसाळ फळांची आवक वाढली

लातूर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने बाजारपेठेत रसाळ फळांची मागणी वाढली आहे. बाजारात टरबूज, खरबूज, द्राक्ष, संत्री, अननस आदी फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र, आवक वाढूनही मागणीमुळे दर मात्र वाढले आहेत. सध्या शहरात तापमानाचा पारा ३२ ते ३३ अंशांपलिकडे गेला आहे.
यामुळे उसाच्या रसाबरोबरच विविध फळांच्या ज्­युसलाही मागणी वाढली आहे. त्या तुलनते चिकू, पपई, सफरचंद, केळी या फळांना जेमतेम मागणी असल्याचे व्यापा-यांनी सागीतले. सफरचंद, चिकू यांचे दर बाजारात स्थिर आहेत. तर अननस, टरबूज, खरबुजांची नगाप्रमाणे विक्री होत आहे. अननस ३० ते ६० रुपये तर टरबूज १० ते ७० रुपये नगाने बाजारात मिळत आहे. तसेच किरकोळ बाजारात द्राक्षांची मोठ्या प्रमाणात रेलचेल होत असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ बाजारात द्राक्ष ५० रुपयात दिड किलो मिळत आहेत. तर  टरबूज १० ते ७० रूपये, डाळीम ४० ते ७० रुपये, पपई ४० रुपये, च्ािंकू ६० ते ८० रुपये, संत्री ३० ते ६० रुपये, सफरचंद ८० ते १२० नारळ  ३० रुपयाला एक नग या दरात बाजारात विक्री केला जात आहे.
शहरातील तापमानाचा पारा चढताच फळ बाजारात थंडगार, रसाळ फळांच्या हंगामाला मोठ्या प्रमाणात सुरवात होत असते. सध्या बाजारात लाल रंगाच्या रसरशीत कंिलगड, टरबूज त्याचबरोबर पपई, द्राक्ष दाखल झाली असून, याला ग्राहकांकडून अधिक मागणी आहे. थंडीची लाट ओसल्यानंतर आता उन्हाचे चटके बसू लागले आहे. उन्हाचापारा देखील दिचसेंदिवस हळूहळू वाढत चालला आहे. यामुळे उन्हाळ्यास सुरवात झाल्याने नागरिकांची लाहीलाही होण्यास सुरवात झाल्याने आता ख-या अर्थाने उन्हाळा सुरु झाल्याचे चित्र आहे.
त्यामुळे वाढत्या उन्हापासून बचाव व्हावा म्हणून नागरिकांकडून रसाळ व थंडगार पेयाला पसंती दिली जात आहे. शरीराला थंडावा देणारी कंिलगडे बाजारात मुबलक उपलब्ध झाली असून, त्यांना ग्राहक पसंती देत आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात फळ बाजारात मुबलक रसाळ फळे दाखल होण्यास सुरवातही झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR