32.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeलातूरलातूरच्या विकासासाठी हक्काचा वाढपी दिल्लीत पाठवूया

लातूरच्या विकासासाठी हक्काचा वाढपी दिल्लीत पाठवूया

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, विमानतळ, पाणी असे प्रश्न सरकारदरबारी अडकले आहेत तर दुसरीकडे आयआयटी, आयआयएम सारख्या संस्था लातुरात उभ्या राहिल्या पाहिजेत. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. अशा विषयांना वाचा फोडून त्याची सोडवणूक करण्यासाठी आपल्या विचाराचे खासदार संसदेत असले पाहिजेत. डॉ. शिवाजी काळगे यांच्या रूपाने आपण आपल्या हक्काचा वाढपी दिल्लीत पाठवून लातूरसाठी अधिकाधिक विकासकामे खेचून आणू, असे आवाहन ‘लातूर ग्रामीण’चे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी येथे केले.
लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या उपस्थितीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समवेत संवाद बैठका आयोजिण्यात आल्या आहेत. याची सुरुवात मंगळवारी (दि. २६) करण्यात आली. पानगाव, कोष्टगाव, कारेपूर, खरोळा या गावांत बैठका घेण्यात आल्या. घनसरगाव, मुरढव, पाथरवाडी, दिवेगाव, रामवाडी (ख) आदी गावांना भेटी देण्यात आल्या. आमदार धिरज देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या गाजलेल्या विधानाची आठवण करू दिली. ‘वाढपी हा आपल्या हक्काचा असला पाहिजे.’ असे विलासराव देशमुख सांगत असत. त्या दृष्टीने आपण कामाला लागून लातूरची जागा मोठ्या मताधिक्याने विजयी करून दाखवू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
वाढत्या बेरोजगारी विरोधात, वाढत्या महागाई विरोधात. लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठीचा हा लढा आहे. त्यामुळे सर्वांनी सजग रहावे, असे सांगून आमदार धिरज देशमुख म्हणाले, की, शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासाठी केंद्र सरकारने गेल्या १० वर्षांत काहीही केले नाही. काँग्रेसच्याच जुन्या योजनांची नावे बदलून त्या नव्याने राबवल्या. एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न दिला पण त्यांच्या सूचनांकडे पाठ फिरवली. शेतक-यांचे म्हणणेही ऐकून घेतले नाही. त्यामुळे जनता सरकारच्या कारभाराला वैतागली आहे, असे म्हणाले.  काँग्रेस सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसच आजच्या अडचणीच्या काळात सामान्यांना न्याय देईल, असा जनतेला ठाम विश्वास वाटत आहे. म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिका-यांंनी पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही आमदार धिरज देशमुख यांनी केले. लोकसभेची ही निवडणूक देशाला दिशा देणारी, विकासाची नवी दृष्टी देणारी आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाणा-या काँग्रेस पक्षाला आपण बळ द्यावे, असे आवाहन डॉ. काळगे यांनी केले.
यावेळी त्र्यंबक भिसे, सर्जेराव मोरे, यशवंतराव पाटील, किरण जाधव, अनुप शेळके, प्रमोद जाधव, अनंतराव देशमुख, रमेश सूर्यवंशी, विश्वास देशमुख, लालासाहेब चव्हाण, उमाकांत खलंग्रे, चंद्रचूड चव्हाण, इम्रान सय्यद, शेषराव हाके पाटील, संजय वारद, चंद्रकांत आरडले, गयाताई कस्पटे, शिवाजी आचार्य, धनंजय चव्हाण, सत्यवान भंडारे, उत्तरेश्वर हलकुडे, किरण हनवते, उमर पठाण, अभिजित चव्हाण, व्ही. के. आचार्य, स्वाती सोमाणी, संग्राम माटेकर, गणपतराव माने, हरिश्चद्र लहाने, प्रभाकर केंद्रे, चंद्रकांत सूर्यवंशी, पूजा इगे, धनराज देशमुख, अनिल कुटवाड, बाळकृष्ण माने, प्रवीण माने, श्रीपतराव माने, उमेश सोमाणी, अमर वाकडे, विश्वनाथ कागले, हणमंत पवार, गोंिवद पाटील, प्रदीप काळे, प्रदीप कापसे, गुलाब चव्हाण, बाळासाहेब करमुडे, शंकर कपाळे, पांडूरंग काळे, जयंतराव कुलकर्णी, धनंजय देशमुख, व्यंकट होळंबे, प्रताप पाटील, बाबाराव पाटील, राजेंद्र डाके आदीसह पानगाव, कोष्टगाव, कारेपूर व खरोळा पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR