Homeलातूरलातूर जिल्ह्यात अंदाजे ६३.५० टक्के मतदान  

लातूर जिल्ह्यात अंदाजे ६३.५० टक्के मतदान  

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ५९ जागा व जिल्ह्यातील १० पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी दि. ७ फेबु्रवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान झाले. जिल्ह्यात अंदाजे ६३.५० टक्के टक्के झाले. या निवडणुकीसाठी मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला होता.
लातूर जिल्ह्यामध्ये ६३.५० टक्के मतदान आहे. यात लातूर ६३ टक्के, अहमदपूर ६५.८१ टक्के, उदगीर ६४.१८ टक्के, निलंगा ६१.१८ टक्के, औसा ६४.१९ टक्के, रेणापूर ६७.२९ टक्के, देवणी ६१.३३ टक्के, शिरुर अनंतपाळ ६०.९६ टक्के, जळकोट ६२.७६ टक्के, तर चाकुर तालुक्यात ६५ टक्के असे एकुण ६३.५० टक्के मतदान झाले आहे.
लातूर तालुक्यातील आर्वी जिल्हा परिषद मतदार गटातंर्गत रेनीसन शाळेत आदर्श मतदान केंद्र म्हणून मतदान केंद्र सजविण्यात आले होते. येथे मतदारांसाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले होते. मतदान केंद्रात प्रवेश करताच दोन्ही बाजुने वेगवेगळ्या रोपांच्या कुंड्या ठेऊन पर्यावरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हरंगुळ बु. या गटात हरंगुळ बु. जिल्हा परिषद शाळेत सखी मतदान केंद्र म्हणून मतदान केंद्र सजवण्यात आले होते. तर मुरुड येथील एक मतदान केंद्र युवा मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते.
सखी मतदान केंद्राला जिल्हाधिकारी यांची भेट
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी रेणापूर तालुक्यातील गव्हाण येथे सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले असून या मतदान केंद्राला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट दिली. तसेच यावेळी मतदानाला आलेल्या मतदारांचे स्वागत केले. रेणापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी, तहसीलदार प्रशांत थोरात यांच्यासह मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांना दिवसभरात भेटी दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR