40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeलातूरश्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सवात आज कुस्ती स्पर्धा

श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सवात आज कुस्ती स्पर्धा

लातूर : प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवानिमित्त आज दि. २४ मार्च रोजी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. कुस्ती स्पर्धा हे श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे आकर्षण असते. मराठवाड्यातील व राज्यातील नामवंत मल्ल या स्पर्धेत सहभागी होतात.यावर्षी रविवारी दुपारी २ वाजल्यापासून स्पर्धेस सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यास देवस्थानच्या वतीने लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मरणार्थ श्री सिद्धेश्वर केसरी चांदीची गदा बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. याशिवाय लातूर शहर मनपा तसेच गोपे परिवार व कोकाटे परिवाराकडूनही विजेत्या मल्लास चांदीचे कडे देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या मल्लांना रोख स्वरुपाची बक्षीसेही दिली जाणार आहेत.

यावर्षी होणा-या कुस्ती स्पर्धेचे देवस्थानच्या वतीने फेसबुक पेजवरुन थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. देवस्थानच्या २्रििँी२ँ६ं११ं३ल्ली२ँ६ं१’ं३४१ या पेजवरुन हे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. ज्या ज्यांना स्पर्धा पाहण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे देवस्थानच्या वतीने कळविण्यात आले आहे. लातूर व परिसरातील मल्लांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा. कुस्ती शौकिनांनी या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR