36.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeलातूरसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सेवेची संधी द्या

सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सेवेची संधी द्या

चाकुर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्व सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मला सेवेची संधी द्यावी, अशी विनंती महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी मतदाराना केली.  लातूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर चाकुर तालुक्यातील चापोली, वडवळ ना. झरी, जानवळ, सर्कलमधील माहाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी डॉ. काळगे म्हणाले की, लातूर जिल्ह्यात गेल्या २७ वर्षापासून वैद्यकीय सेवा लाखो नागरिकांना दिलेली आहे. शेतक-यानी उत्पादन केलेल्या मालास हमी भाव देण्यासाठी मी संसदेत आवाज उठवणार आहे. मी स्वत: शेतक-यांचा मुलगा आहे. शेतक-याच्या समस्यांची मला पुर्ण जाणीव आहे. मतदारसंघात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजुन कायमच आहे. त्याचे योग्य नियोजन करून कायम स्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवू असे ते म्हणाले. महिला, शेतमजुर, बेरोजगार,महागाई,दिवसेंदिवस वाढत चालेली महागाई रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. टमाटे उत्पादकासाठी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक विद्यामान खासदार असताना गेल्या पाच वर्षात जन्मभूमी असलेल्या तालुक्यात विकास निधी आणण्यात अपयशी ठरले आहेत, असे डॉ. काळगे यावेळी म्हणाले.
चापोली येथील बैठकीत बोलताना विक्रांत गोमजगुडे म्हणाले की, डॉ.शिवाजी काळगे यांच्या रूपाने निष्कलंक, चरित्र्यसंपन्न, उच्च्­ाविद्याविभूषित लोकांच्या कामाला येणारे उमेदवार दिले आहेत. मतदारांनी डॉ.शिवाजी काळगे यांना येणा-या ७ में रोजी भरघोस मतांनी विजय करावे असा दृढ संकल्प चाकूर तालुक्यातील कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदधिका-याच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी एन.आर.पाटील,विलासराव पाटील,यांनीही आपले विचार व्यक्त करताना म्हणाले अहमदपूर-चाकुर विधानसभेतून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांची आघाडी देऊ असा संकल्प व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या सर्वच पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वत: उमेदवार समजून प्रचार कार्यात सक्रीय व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
लातूर लोकसभेचे इंडीया (महाविकास) आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी प्रचारार्थ जनसंवाद दौ-यात चाकुर तालुक्यातील महाविकास आघाडी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला.  याप्रसंगी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब पाटील, चाकूर काँग्रेस तालुका अध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक एन. आर. पाटील, डॉ. गणेश कदम, चंद्रकांत मद्दे, सिराजोद्दीन जहागीरदार, निलेश देशमुख, शेख पप्पू सलीम तांबोळी, बी.एन.चाटे,अनिल चव्हाण ,गंगाधर केराळे,बाळु इरवाणे,यांच्यासह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR