40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeलातूरशेतक-यांची कोंिथबीर लागवडीला पसंती

शेतक-यांची कोंिथबीर लागवडीला पसंती

शिरुर अनंतपाळ : शकिल देशमुख
उन्हाळी हंगामात शेतक-यांना कोंिथबीर आधार देत असून कमी वेळात चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पिक म्हणून कोंिथबीर लागवडीला शेतकरी सर्वाधिक पसंती देत आहेत. कोंिथबीर उत्पादनातून हमखास उत्पन्न मिळत असल्याने तालुक्यात कोंिथबीर लागवडीत वाढ झाली असून यातून कोंिथबीरउत्पादक शेतक-यांंना चांगला आर्थिक फायदा होताना दिसत आहे.सध्या शेतात कोंिथबीर बहरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
यंदा खरीप हंगाम हातचे गेले त्यात रब्बी हंगामात हरभ-याने दिगा दिल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ज्या शेतक-यााकडे पाणी उपलब्ध आहे. अशात उन्हाळी हंगामात कोंिथबीर शेतक-यासाठी वरदान ठरत आहे. दरम्यान गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देवून विकेल ते पिकेल या उक्तीप्रमाणे कोंिथबीर घेण्याकडे वळले आहेत. यावर्षी ही शेतक-यांंनी कोंिथबीरची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. बाजारात सरासरी भाव मिळत असतानाही त्यातही समाधान मानत शेतकरी कोंिथबीर उत्पादनाकडे वळले असून एकाचे बघून दूसरे शेतकरी देखील त्यांचे अनुकरण करताना दिसत आहेत. या कोंिथबीर उत्पादनातून चांगले पैसे मिळत असल्याने शेतक-याातून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोंिथबीर घेण्यासाठी काही शेतकरी व्यापा-यासोबत करार करुन जमीन व पाणी उपलब्ध करुन दिल्यास व्यापारी पेरणीसह सर्व लागवड घालणार व त्यातून जे उत्पन्न मिळेल ते आपसात वाटून घेणार असे ठरवले जाते तर अनेक शेतक-याांंनी स्वत: लागवड करून काढणी योग्य झाल्यास व्यापा-याशी संपर्क साधून एकरच्या प्रमाणे फड विकत आहेत. सध्या यातून समाधानकारक पैसे मिळत असल्याने तालुक्यातील शेतक-यांचा कोंिथबीर लागवडीकडे कल दिसून येत असून उन्हाळी हंगामात शेतक-यांंना कोंिथबीर आधार ठरत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR