29.5 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रबारामतीत ३ महिन्यांत ५६ हजार नवे मतदार

बारामतीत ३ महिन्यांत ५६ हजार नवे मतदार

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात तीन महिन्यांत ५६ हजार ७०० मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे ७ मे रोजी होत असलेल्या मतदानात २३ लाख ७२ हजार ६६८ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. ही संख्या अंतिम झाली असून, ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २३ जानेवारीला अंतिम मतदारयादी जाहीर केली होती. त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघात २३ जानेवारीला २३ लाख १५ हजार ९६८ इतके मतदार नोंदविले गेले होते. त्यानंतरही मतदार नोंदणीची मोहीम सुरू होती. आता बारामती मतदारसंघासाठी मतदार नोंदणीची मोहीम थांबवली असून मतदानासाठी २३ लाख ७२ हजार ६६८ मतदार निश्चित केले आहेत. यावरून २३ जानेवारीपासून २३ एप्रिल या तीन महिन्यांत ५६ हजार ७०० मतदारांची वाढ झाली आहे.

जिल्ह्यात २३ जानेवारीला ८१ लाख २७ हजार १९ मतदारसंख्या निश्चित केली होती. त्यानंतर १६ मार्चपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये १२ एप्रिलपासून तर पुणे, मावळ आणि शिरूरमध्ये १८ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. अर्ज भरण्याच्या दहा दिवस आधीपासून त्या-त्या मतदारसंघातील नवमतदारांना अर्ज भरण्याची मुदत होती. त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंखाची मतदार नोंदणीची मुदत दोन एप्रिलला संपुष्टात आली. त्यानंतर मतदारसंघातील मतदारसंख्या निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मंगळवारी अंतिम मतदार निश्चित झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR