34.8 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeक्रीडासफराज खान मुंबईच्या संघात ?

सफराज खान मुंबईच्या संघात ?

नवी दिल्ली : आयपीएल २०२४ ला अवघ्या दोन दिवसात सुरुवात होणार आहे. अशातच खेळाडूंच्या फिटनेसमुळे फ्रँचायझींची डोकेदूखी वाढली आहे. मुंबई इंडियन्स संघाने आपाल्या सरावाला सुरूवात केली आहे .

मात्र सूर्या अद्याप सरावासाठी संघात दाखल झाला नाही. त्याची पुढील फिटनेस चाचणी २१ मार्च रोजी होणार आहे. या चाचणीत सूर्याला फिटनेस प्रमाणपत्र मिळाले नाहीतर तो आयपीएलच्या काही सामन्यापासून दूर राहू शकतो. तर अशातच सूर्याच्या दुखापतीमुळे मुंबईच्या संघात सरफराज खानला संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, सूर्याला २१ मार्च रोजी होणा-या चाचणीत फिटनेस प्रमाणपत्र मिळाले नाही, तर मुंबईला चांगलाच झटका बसू शकतो, अशातच मुंबईसाठी आनंदाची बामतीही समोर येत आहे. संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने संघ व्यवस्थापनाकडे युवा फलंदाज सफराज खानची शिफारस केली आहे. मात्र, आएपीएल २०२४ च्या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या सफराजला मुंबई संघात कसे स्थान मिळणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सफराजला संधी मिळाली तर तो यूर्याची जागा भरून काढेल अशी चर्चो सुरू आहे. मुंबईचा पहिला सामना २४ मार्चला होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR