32.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरअंगणवाडी सेविका शांताबाई जाधवर यांचा सीईओ आव्हाळे यांच्या हस्ते सत्कार

अंगणवाडी सेविका शांताबाई जाधवर यांचा सीईओ आव्हाळे यांच्या हस्ते सत्कार

बार्शी : तालुक्यातील बोरगाव येथील अंगणवाडी सेविका सौ. शांताबाई अंकुशराव जाधवर यांना जिल्हा परिषद, सोलापूर यांच्याकडून सन २०२३-२४ चा दिला जाणारा आदर्श अंगणवाडी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशासनातील विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बोरगावच्या अंगणवाडी सेविका सौ. शांताबाई अंकुशराव जाधवर यांना जिल्हा परिषद, सोलापूर यांच्याकडून आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल बोरगाव ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोरगाव सोसायटीचे चेअरमन तथा वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब जाधवर, माजी सरपंच तथा वंजारी सेवा संघाचे बार्शी तालुकाध्यक्ष ईश्वरचंद्र जाधवर, केंद्रप्रमुख राजीव कांदे, सरपंच विशाल कांदे, माजी चेअरमन पोपट कांदे, मुख्याध्यापक कुलकर्णी, शिक्षक जाधवर, पडवळ, गरड, बोरगाव येथील अंगणवाडी सेविका शेफ शालिनी, मदतनीस गायकवाड, मुंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

आगळगाव बीटमधील बोरगाव येथील अंगणवाडी सेविका शांताबाई जाधवर यांचा सोलापूर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या हस्ते सत्कार झाल्याबद्दल बार्शी महिला बाल कल्याण विभागाच्या सीडीपिओ रेश्मा पठाण, विस्ताराधिकारी सदाफुले, आगळगाव बीटच्या पर्यवेक्षक विजया सोनवणे त्यांच्यासह बोरगाव ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे. बार्शी तालुक्यातील ६ अंगणवाडी सेविका व ६ मदतनिसांना आदर्श पुरस्कार मिळाला आहे. आगळगाव बीटच्या पर्यवेक्षक विजया सोनवणे यांनी सेविका शांताबाई जाधवर यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR