40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरप्रसाद लोंढे दोन जिल्ह्यांतून दोन वर्षांकरिता तडीपार

प्रसाद लोंढे दोन जिल्ह्यांतून दोन वर्षांकरिता तडीपार

सोलापूर- सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याबरोबरच विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेला प्रसाद ऊर्फ प्रशांत महादेव लोंढे (वय ३३, रा. अवंतीनगर – फेज-१, जुना पुना नाका, सध्या रा. सैफुल) यास दोन – जिल्ह्यांतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिला.

२००९ ते २०२३ या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी नोकरांचे कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी आदेशांचे उल्लंघन करणे, सार्वजनिक मिरवणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे चिथावणीखोर वक्तव्य करणे, अवैध जुगार चालवून त्यावर मिळालेल्या उत्पन्नातून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त (परिमंडळ), यांना सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त कबाडे यांनी प्रसाद ऊर्फ प्रशांत लोंढे यास सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यांतून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर हडपसर, पुणे येथे सोडण्यात आले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR