34.1 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडाबाबर आझम पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार!

बाबर आझम पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार!

क्रिकेट बोर्डाने केली अधिकृत घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तान क्रिकेट संघाने अखेर बहुचर्चित प्रश्नांना पूर्णविराम लावत बाबर आझमची पुन्हा एकदा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. निर्धारित षटकांचे क्रिकेट म्हणजे टी-२० आणि वनडे संघासाठी बाबर आझम पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असेल असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्वीटद्वारे स्पष्ट केले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची निवड समिती आणि पीसीबी चेअरमन मोहसीन नक्वी यांनी एकमताने बाबर आझमची पुन्हा एकदा कर्णधार म्हणून निवड केल्याचे ट्वीटमधून सांगण्यात आले.

पाकिस्तानच्या टी-२० संघाचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी होता. पण, त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याचे समजताच त्याने पद सोडले. त्यानंतर बाबरला पुन्हा नेतृत्वाची संधी देण्यात आली आहे.

दिलेल्या माहितीनुसार, शाहीन आफ्रिदी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर नाराज होता. नक्वी आणि निवडकर्त्यांनी आफ्रिदीशी चर्चा न करता त्याला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले गेले. शाहीनच्या नेतृत्वात पाकिस्तानने केवळ एक टी-२० मालिका खेळली. त्यातही त्यांचा ४-१ असा पराभव झाला. त्यामुळे त्याला पदावरून हटवण्यात आले असल्याची चर्चा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR