40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरछ. संभाजीनगरात खैरे विरुद्ध भुमरे असा होणार सामना

छ. संभाजीनगरात खैरे विरुद्ध भुमरे असा होणार सामना

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीने याआधीच छत्रपती संभाजीनगरासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खैरे यांना तिकीट मिळाल्यानंतर महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार, असे विचारले जात होते. शिवसेना-भाजप यांच्या युतीत हा मतदारसंघ नेहमी शिवसेनेकडे राहिलेला आहे. यावेळी मात्र भाजपनेदेखील या जागेवर आपला दावा सांगितला होता. परिणामी या जागेवर महायुतीने उमेदवाराची घोषणा केली नव्हती. दरम्यान, आता संदिपान भुमरे यांच्या नावावर मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिकांमघ्ये लढाई रंगणार आहे. छत्रपती संभाजीगरच्या उमेदवारीबाबत एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीतच संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयानंतर आता संदिपान भुमरे यांनीदेखील तयारी चालू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते येत्या २५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

वंचितनेही दिला उमेदवार, नेमके काय होणार?
संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर येथे शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत पक्की झाली आहे. मात्र येथे वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार दिला आहे. वंचितच्या या उमेदवाराचा चंद्रकांत खैरे यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR