37 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रदादाची ‘क्या बात...’

दादाची ‘क्या बात…’

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. अजित पवार यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार होती. या प्रकरणी आता अजित पवार यांना आयोगाने दिलासा दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील रिटर्निंग ऑफिसर यांनी अजित पवार यांनी क्लीन चिट दिली. निवडणूक आयोगाने काल एक अहवाल पाठवला आहे. या अहवालात अजित पवार यांनी इंदापूर येथील सभेत केलेल्या वक्तव्यात आदर्श आचारसंहितेचा भंग नसल्याचे आहवालात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हीडीओ पाहिला. या व्हीडीओत आचार संहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळून आलेले नाही, अशी माहिती निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. अजित पवार यांच्या सभेतील व्हीडीओत पवार यांनी कोणत्याही पक्षाचे किंवा उमेदवाराला मते द्यायची या उल्लेख केलेला नाही. अजित पवार मतदारांना ईव्हीएमसाठी मतदान करण्यास सांगत असल्याचे ऐकले, उमेदवार किंवा पक्षाला मत द्या, असे ते म्हणालेले नाहीत यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही, असेही त्यांनी यात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR