39.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडाधोनीच्या २० धावा रोहितच्या १०० वर भारी

धोनीच्या २० धावा रोहितच्या १०० वर भारी

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचा २० धावांनी पराभव केला. यामुळे रोहित शर्माच्या शतकावर धोनीच्या २० धावा भारी पडल्या. सीएसकेने हा सामना जिंकून कोलकाता नाईट रायडर्सची गुणतालिकेत आठ गुणांसह बरोबरी केली आहे. ०.७२६ च्या निव्वळ रनरेटसह गुणतालिकेत संघ तिस-या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या २९ व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटकात ४ गडी गमावून २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने २० षटकांत ६ गडी गमावून १८६ धावा केल्या.

या सामन्यात मुंबईने दमदार सुरुवात केली होती. इशान किशन आणि रोहित शर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी झाली. पाथीरानाने एमआय विरुद्ध प्राणघातक गोलंदाजी केली. या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या. तिस-या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूयार्ला २१ वर्षीय गोलंदाजाने शून्यावर बाद केले. यानंतर तिलक वर्मा आणि हिटमन यांच्यात तिस-या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी झाली.त्याला पाच चौकारांच्या मदतीने ३१ धावा करता आल्या. या सामन्यात हार्दिक पांड्याची बॅट चालली नाही. तो फक्त दोन धावा करून बाद झाला. तुषार देशपांडे यांनी त्याला आपला बळी बनवले. चेन्नईविरुद्ध टीम डेव्हिड १३ धावांवर नाबाद राहिला, रोमॅरियो शेफर्डने एक धाव आणि मोहम्मद नबी चार धावांवर नाबाद राहिला.

सीएसकेला संघाला चौथा धक्का डॅरिल मिशेलच्या रूपाने बसला. तो १७ धावा करून तंबुत परतला. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पंड्याने त्याला झेलबाद केले. यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या धोनीने शेवटच्या चार चेंडूत २० धावा केल्या. धोनीने पांड्याला लागोपाठ तीन चेंडूत तीन षटकार ठोकले. या काळात त्याचा स्ट्राइक रेट ५०० होता. धोनीच्या फलंदाजीचा हा अवतार पाहून त्याचे चाहते सुखावून गेले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR