37.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीयड्रग्ज तस्करीत चित्रपट निर्माता जफर सादिक यास अटक

ड्रग्ज तस्करीत चित्रपट निर्माता जफर सादिक यास अटक

नवी दिल्ली : अंमली पदार्थ नियंत्रण (एनसीबी) विभागाने ड्रग्स प्रकरणात मोठी कारवाई केली. दक्षिण भारतातील चित्रपट सृष्टीतील बड्या निर्मात्याला अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली. चित्रपट निर्माता जफर सादिक असे त्यांचे नाव आहे.

गेल्या काही दिवसांपासून एनसीबी जफर सादिकच्या शोधात होती. जफर सादिक यांनी आतापर्यंत दोन हजार कोटींचे ड्रग्स विदेशात पाठवले. ४५ वेळा सूडोएफिड्रिन नावाचे ड्रग्स त्यांनी विदेशात पाठवले. जफर सादिक राजकारणातही आहे. डिएमके पक्षाचे डिप्टी सेक्रेटरी ते राहिले आहेत. या प्रकरणानंतर डीएमकेकडून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. या प्रकरणानंतर चित्रपटसृष्टी आणि राजकारणातही खळबळ माजली आहे.

एनसीबीने सादिकला भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पसरलेल्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणा-या टोळीचा म्होरक्या म्हणून संबोधले आहे. गेल्या महिन्यात, ‘एनसीबी’ने दिल्लीतील एका गोदामावर छापा टाकून तिघांना अटक केली होती आणि ५० किलो केमिकल सूडोएफिड्रिन जप्त केले होते.

एनसीबीने दिल्लीत तीन जणांना ड्रग्स तस्करी प्रकरणात अटक केली. त्यानंतर जफर सादिकचा शोध सुरु होता. जफर सादिक दक्षिण भारतातील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे. त्यांच्या काही चित्रपटाचे काम सुरु आहे. एक चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. चार चित्रपट त्यांचे पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीने जफर सादिक याच्या ड्रग्स प्रकरणाचा खुलासा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जफर सादिक ड्रग्स तस्करीत गुंतल्याचे एनसीबीचा दावा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR