33.2 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरनोकरीचे आमिष देत सहा लाखांना गंडा, दोघांविरुद्ध गुन्हा

नोकरीचे आमिष देत सहा लाखांना गंडा, दोघांविरुद्ध गुन्हा

सोलापूर : बेरोजगार असल्याचागैरफादा उठवत दोघांनी मिळून तरुणाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट ऑफर लेटर देऊनत्याच्यासह त्याच्या मित्राकडून एकूण ५ लाख ९७ हजार रुपयांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. महिबूब हसनसाब हेमुने (रा. मड्डी वस्ती, होटगी स्टेशनजवळ, सोलापूर), अकबर धवलजी शेख (रा. मित्रनगर, शेळगी, सोलापूर), अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी माधुरी संजय कोपरे यांनी फिर्याद दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, फिर्यादीचा मुलगा अक्षय याचा विश्वास संपादन करून नमूद दोघांनी त्याच्याकडून नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार एन.टी.पी.सी. कंपनीच्या अधिकाऱ्यांचे सही, शिक्का असलेले बनावट आभार लेटर, ट्रेनिंग लेटर, नेमणुकीचे पत्र, ऑफर लेटर फिर्यादीचा मुलगा अक्षय याला दिले. या बदल्यात त्याच्याकडून ५ लाख ५० हजार रुपये घेतले. हा प्रकार २२ नोव्हेंबर २०२३ रोजी काडादी चाळ येथे घडला.

याचबरोबर फिर्यादीच्या मुलगा अक्षय याचा मित्र अमोल शरणबसवेश्वर तारापूर याच्याकडूनही अशाच प्रकारे फसवणूक करून ४७,५०० रुपये घेतले. प्रत्यक्षात नोकरी न लावता पैशाबद्दल पाठपुरावा करूनही आजतागायत परत केले नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सदर बझार पोलिसांनी भा.दं. वि. ४२० अन्वये गुन्हा नोंदवून घेतला आहे. पुढील तपास महिला सहा. पोलिस निरीक्षक कुदळे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR