33.2 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरतरुणाविरुद्ध अत्याचारासह अट्रॉसिटीचा गुन्हा

तरुणाविरुद्ध अत्याचारासह अट्रॉसिटीचा गुन्हा

सोलापूर: लग्नाचे आमिष दाखवून पीडित तरुणीवर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिली. लग्नाची विचारणा करता तिला जातिवाचक शिवीगाळ करून नकार देण्याची धक्कादायक घटना शहरातील एका भागात उघडकीस आली. हा प्रकार २०२२ पासून आजतागायत घडला. असहाय पीडितेने अखेर धाडस करून तरुणाविरुद्ध जोडभावी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने अट्रॉसिटी व अत्याचाराचा गुन्हा नोंदला आहे. समाधान किसन कदम (वय ३०, रा. रोपळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पीडितेची आणि नमूद आरोपीची ओळख झाली. यातून आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून सन २०२२ पासून तिच्याशी इच्छेविरुद्ध अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिली. यानंतर पीडितेने त्याला वारंवार लग्न करण्यासाठी लकडा लावला. तेव्हा त्याने टाळाटाळ केली. अखेर त्याने मी खालच्या जातीची आहे, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही म्हणून जातिवाचक शिवीगाळ केली, मारहाण करून ‘तुला काय करायचे ते कर’ अशी धमकी दिली.फिर्यादी ही निराधार असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने हे कृत्य केले.

या प्रकारामुळे पीडितेला कोणाचा आधार नसल्याने ती कोलमडली. अखेर तिने धाडस करून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिल्याचे नमूद केले आहे.याप्रकरणी सहा. पोलिस आयुक्त अशोक तोरडमल, महिला पोलिस निरीक्षक शेख यांनी रविवारी सकाळी पीडितेशी संवाद साधून तिची कैफियत ऐकून घेतली. त्यानुसार गुन्हा नोंदला आहे. तपास स्वतः सहा. पोलिस आयुक्त अशोक तोरमडल यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR