30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरचोरीची बाइक, मोबाइल अन् रोकड जप्त, गुन्हे शाखेची कामगीरी

चोरीची बाइक, मोबाइल अन् रोकड जप्त, गुन्हे शाखेची कामगीरी

सोलापूर : रात्रीची वेळ साधून वाटसरूकडून रोकड आणि मोबाइलद्वारे ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर करून घेणारा सराईत गुन्हेगार तरुणाला खबऱ्याने दिलेल्या टिपने विडी घरकुल परिसरातून गुन्हे शाखेच्या पथकाने उचलले. त्याच्याकडून चोरीची बाइक, मोबाइल, रोख ८ हजार असा ८३ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. नितीन विठ्ठल भोसले (वय २८, रा. सग्गरनगर, विडी घरकुल, सोलापूर) असे या आरोपीचे नाव आहे.

५ एप्रिलच्या रात्री पावणेदहाच्या सुमारास नमूद आरोपीने मित्रनगर, शेळगी येथे प्रवीण मुरारी सागर हा साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून शेळगी येथील लक्ष्मीनगरककडे जात असताना नमूद आरोपीने त्याला दुचाकी आडवी लावून मारहाण केली व त्याच्या खिशातून १७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. मोबाइलवरून फो पे द्वारे ८ हजार रुपये स्वतःच्या खात्यावर ट्रॉन्स्फर करून घेतले होते. जोडभावी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा शोध गुन्हे शाखेचे पथक घेत होते

सपोनि श्रीनाथ महाडिक यांच्या पथकाला या गुन्ह्यातील संशयित विडी घरकूल येथील सिफा बेकरीजवळ थांबल्याची खबर लागली. त्यांनी लागलीच कूच करीत सापळा लावून वरील आरोपीला हटकले. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याला उचलले. खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यात त्याने १७०० रुपये काढून दिले. जवळील मोबाइल व बाइकही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारे एकूण ८३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राज कुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहा. पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीनाथ महाडिक, पोलिस अंकुश भोसले, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अभिजित धायगडे यांनी केली

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR