38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्याजग्गी वासुदेव यांच्यावर तातडीची ब्रेन सर्जरी

जग्गी वासुदेव यांच्यावर तातडीची ब्रेन सर्जरी

नवी दिल्ली : ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि आध्यत्मिक गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी तातडीची ब्रेन सर्जरी करण्यात आली. मागील चार आठवड्यांपासून डोकेदुखीने ते त्रस्त होते असे सांगितले जात आहे. दरम्यान त्यांच्या मेंदूला मोठी सूज आली आणि रक्तस्त्राव झाल्यानंतर दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली.
जग्गी वासुदेव यांची तब्यत बिघडल्यानंतर १७ मार्च रोजी अपोलो रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या मेंदूवरील सूज खूपच वाढल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. १७ मार्च रोजी इमर्जन्सी ब्रेन सर्जरी करण्यात आली. सध्या जग्गी वासुदेव यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR