41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरसिद्धेश्वर कारखाना परिसरातील साडेतीन एकर जागा विमानतळाच्या ताब्यात

सिद्धेश्वर कारखाना परिसरातील साडेतीन एकर जागा विमानतळाच्या ताब्यात

सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आणि सिद्धेश्वर प्रशाला परिसरातील साडेतीन एकर जागा गुरुवारी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने ताब्यात घेतली. या जागेला संरक्षक भिंत बांधण्यात येईल, असे विमानतळ व्यवस्थापक बानोत चांपला यांनी सांगितले.

सोलापूर विमानतळासाठी १९५२ साली भूसंपादन झाले होते. यातील ३५ एकर जागेवर अतिक्रमण झाले आहे. आणखी साडेतीन एकर जागेवर कारखाना परिसरातून कब्जा झाल्याचे एअरपोर्ट अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. विमानतळाची जागा ताब्यात घेऊन संरक्षक भिंत बांधण्याचेकामही सुरू आहे. यादरम्यान, जिल्हा प्रशासन, भूमी अभिलेख कार्यालय आणि एअरपोर्ट अथॉरिटीने २० मार्च रोजी सिद्धेश्वर प्रशाला ते विमानतळाची संरक्षक भिंत येथील साडेतीन एकर जागा ताब्यात घेण्याची नोटीस बजावली होती. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कारखाना परिसराला भेट दिली. जागा ताब्यात घेण्यासाठी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. महसूल कर्मचाऱ्यांनाही सूचना दिल्या.

एअरपोर्ट अथॉरिटीने कारखाना जागेत अतिक्रमण करू नये असे आमचे म्हणणे आहे. विमानतळाच्या जागेला पूर्वीच संरक्षक भित बांधणे अपेक्षित होते. आम्ही आमच्या जागेसाठी भांडत आहोत. आम्ही गुरुवारी हरकत नोंदवली आहे. प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयाचा निकाल मान्य असेल. असे सिद्धेश्वर कारखाना उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते म्हणाले.

एअरपोर्ट अथॉरिटीचे व्यवस्थापक बानोत चांपला, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक नितीन सावंत पोलिस बंदोबस्त घेऊन कारखाना परिसरात पोहोचले. सोबत भूमी अभिलेख कार्यालयातील इतर अधिकारी होते. जेसीबी, पोकलेन आणि कामगार सिद्धेश्वर प्रशालेजवळ पोहोचले. जागेची हद्द निश्चित करून खांब रोवण्यास सुरुवात करण्यात आली. कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते आणि इतर लोक दाखल झाले. एअरपोर्ट अथॉरिटीच्या पथकाने हद्दीच्या बाजूने खोदाई केली. या ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम सुरू होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR