36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeनांदेडनांदेडचे तहसीलदार वारकड यांची बदली

नांदेडचे तहसीलदार वारकड यांची बदली

नांदेड : येथील तहसीलदार संजय वारकड यांचे नुकतीच बदली झाल्याचे आदेश शासनाने काढले असून त्यांच्या जागी नांदेड जिल्हाधिकारी कार्यातील संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार उमाजी बोथेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सध्या प्रशासनातील अधिका-यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. या अंतर्गत महसूल विभागाच्या अंतर्गत तहसीलदार संवर्गातील अधिका-यांच्या बदल्या करण्याचे आदेश निघाले आहेत. यात नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांची बदली करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार म्हणून ते आता काम पाहणार आहेत तर संगायोचे तहसीलदार उमाजी बोथीकर यांची वारकड यांच्या जागी नांदेडचे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बदलांचे आदेश शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अंतर्गत नुकतेच काढण्यात आले आहेत या दोन्ही अधिका-यांची नांदेड येथेच अदलाबदली करण्यात आले आहे. आगामी लोकसभेच्या अनुषंगाने प्रशासनातील अनेक उच्चपदस्थ तथा पोलिस महसूल प्रशासनातील अधिका-यांच्या बदल्या करण्यात येत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR