37.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
HomeUncategorizedयशवंतराव चव्हाण यांच्यासह ३५ खासदार बिनविरोध

यशवंतराव चव्हाण यांच्यासह ३५ खासदार बिनविरोध

 

नवी दिल्ली : सुरतमध्ये झालेल्या बिनविरोध निवडणुकीत विजयी झालेले मुकेश दलाल यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे खाते उघडले. कॉँग्रेससह विरोधी पक्षांनी या बिनविरोध निवडणुकीवरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. मात्र, ही बिनविरोध निवडीची परंपरा पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून चालत आली असून देशात १९५१ पासून आतापर्यंत असे ३४ जण बिनविरोध निवडून आले होते. त्यात यशवंतराव चव्हाण यांचाही समावेश आहे.

मागील ७० वर्षात १९५१ पासून ३४ जणांची बिनविरोध निवड झाली. अलिकडच्या काळात म्हणजे २०१२ ला समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी कन्नौज लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक बिनविरोध ज्ािंकली होती.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले यशवंतराव चव्हाण हे देखील लोकसभेवर नाशिकमधून बिनविरोध निवडून गेले होते. यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला, हरेकृष्णा महताब, टी.टी.कृष्णमाचारी, पी.एम.सईद आणि एस.सी.जमीर हे देखील बिनविरोध खासदार झाले होते.

१९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त सात उमेदवार बिनविरोध जिंकले. त्याआधी १९५१ च्या आणि त्यानंतर १९६७ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येकी पाच उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला होता. १९६२ मध्ये ३ आणि १९७७ मध्ये दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते, तर १९७१, १९८० आणि १९८९ मध्ये प्रत्येकी एक उमेदवार अशाच पद्धतीने निवडणूक ज्ािंकला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR