30.7 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रसिद्धेश्वर महाराजांप्रमाणेच नवनीत राणांचेही तिकिट कापणार?

सिद्धेश्वर महाराजांप्रमाणेच नवनीत राणांचेही तिकिट कापणार?

अनिल बोंडेंचा खळबळजनक दावा

मुंबई : प्रतिनिधी
बोगस जातप्रमाणपत्रावरून सोलापूरचे विद्यमान खासदार सिद्धेश्वर महाराज यांना यावेळी लोकसभेचे तिकिट देण्यात आले नाही. भाजपाने त्यांचे तिकिट कापून बीडच्या राम सातपुते यांना दिले आहे. असाच नियम भाजपा अमरावतीमध्ये नवनीत राणांना लावणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.
यावर भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार नवनीत राणा यांच्याकडेही जातीचे बोगस प्रमाणपत्र आहे. उच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात निकाल प्रलंबित आहे. येत्या १ एप्रिलला यावर निकाल येण्याची शक्यता आहे. नवनीत कौर राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राणांविरोधात आला तर भाजपा लोकसभा उमेदवारी देणार नसल्याची शक्यता आहे.

सोलापूरप्रमाणे अमरावतीतही भाजपा राणांना डच्चू देणार असल्याची चर्चा आहे. राणा भाजपाच्या तिकिटावरून लढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपानेही अमरावतीची जागा भाजपाच्याच तिकिटावर लढविली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप खासदार अनिल बोंडेंच्या वक्तव्याने नवनीत राणांची धाकधूक वाढली असून, राणा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR