29.2 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeक्रीडाहॉकी इंडियाने राष्ट्रीय शिबिरासाठी केली संभाव्य २८ नावांची घोषणा

हॉकी इंडियाने राष्ट्रीय शिबिरासाठी केली संभाव्य २८ नावांची घोषणा

नवी दिल्ली : हॉकी इंडियाने सोमवारी भुवनेश्वरमधील कलिंगा हॉकी स्टेडियमवर १२ मार्च ते ३० मार्च या कालावधीत होणा-या वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय प्रशिक्षक शिबिरासाठी २८ सदस्यीय संभाव्य गटाची घोषणा केली.हे शिबिर भारतीय हॉकी संघासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण पॅरिस २०२४ ऑलिम्पिकपूर्वी भारतीय हॉकी संघाला आपली मजबूत तयारी करायची आहे.

राष्ट्रीय प्रशिक्षक शिबिरामध्ये गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठक, पीआर श्रीजेश, सूरज करकेरा आणि बचावपटू हरमनप्रीत सिंग, जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित आणि अमीर अली यांचा समावेश आहे. तर शिबिरासाठी बोलावलेल्या मिडफिल्डर्समध्य मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, रविचंद्र सिंग, समशेर सिंग, नीलकंठ शर्मा, राजकुमार पाल, विष्णुकांत सिंग यांचा समावेश आहे. फॉरवर्ड्सच्या यादीत आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, दिलप्रीत सिंग, सुखजित सिंग, गुरजंत सिंग, मोहम्मद राहिल मोहसिन, बॉबी सिंग धामी आणि अरिजित सिंग हुंदल यांचा समावेश आहे.

भारताचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी आगामी शिबिराच्या महत्त्वाबाबत सांगितले की, आम्हाला या शिबिरात प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग सुरू करायचा आहे आणि मोठ्या सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी आम्ही चांगल्या स्थितीत आहोत याची खात्री करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय प्रशिक्षक शिबिरासाठी निवडण्यात आलेले खेळाडू हे आगामी महत्त्वाचे सामने खेळण्यासाठी दावेदार असतील. म्हणून, आम्ही अनुभवी खेळाडूंचा एक गट तसेच प्रो लीगमध्ये खेळलेल्या काही तरुणांची निवड केली आहे, असे फुल्टन म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR