27 C
Latur
Friday, March 6, 2026
Homeलातूरजागतिक सुविधा आता लातूरच्या सरकारी रुग्णालयात

जागतिक सुविधा आता लातूरच्या सरकारी रुग्णालयात

लातूर : प्रतिनिधी
अति गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी गोल्डन अवर महत्वाचा मानला जातो. हीच गरज ओळखून येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ६० खाटांचे अद्ययावत मॉड्युलर आयसीयू उभारले जात आहे. विशेष म्हणजे खाजगी रुग्णालयापेक्षाही अधिक अशा जागतिक दर्जाच्या सुविधा येथे मिळणार आहेत. येत्या महिनाभरात हे आयसीयू रुग्णसेवेत दाखल होईल. यामुळे मराठवाड्यातील अति गंभीर रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विविध आजारग्रस्त असलेल्या आणि आरोग्याची स्थिती अति गंभीर  असलेल्या रुग्णांना तातडीने व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची आवश्यकता असते. या सुविधा विविध रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयुमध्ये मिळतात. जिल्ह्यातील सर्वात मोठे टर्शरी केअर हॉस्पिटल असलेल्या लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ६० खाटांचे अद्ययावत व सर्व सुविधांनीयुक्त अशा मॉड्युलर आयसीयू(एम-आयसीयू) उभारण्यात येत आहे. अति गंभीर रुग्णान्ाां आवश्यक वैद्यकीय उपचार हे तात्काळ मिळणार आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविलद्यालय आणि रुग्णालयाच्या बा रुग्ण विभागात दररोज १८०० ते १९०० रुग्ण उपचार घेतात. तर आंतररुग्ण विभागात दररोज ६०० ते ६५० रुग्ण दाखल होतात. याशिवाय अपघात विभागात दररोज १० ते १५ अपघात घटनांतील रुग्ण येत असतात. मॉड्युलर आयसीयूमध्ये अद्ययावत यंत्रसामुग्री असल्यामुळे जागतिक दर्जाच्या सुविधा या लातूर आणि परिसरातील रुग्णांना त्याही मोफत मिळणार आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविलद्यालय आणि रुग्णालय हे मॉड्युलर आयसीयू असलेले एकमेव  रुग्णालय ठरणार आहे. या मॉड्युलर आयसीयुमुळे आता रुग्णांना महानगरांकडे जाण्याची वेळ येणार नाही. या मॉड्युलर आयसीयुमध्ये व्हेंटिलेटर, डायलिसीस मशिन, टु-डी इकोमशीन, सेंंट्रल पेशंट, मॉनिटरिंग सिस्टिम, वाताणुकुलित यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत.
विषबाधा, सर्पदंश, -हदयविकार रुग्ण, किडनी विकार, निमोनिया, पॅरालिसिस, दमा-अस्थमाच्या अति गंभीर रुग्णांना तातडीने व्हेंटिलेटरची गरज भसते. ती पुर्ण होणार आहे. आयुसीयूमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व मॉनिटरिंग, अशा सुविधा असल्यामुळे जीवाचा धोका कमी होऊन उपचाराला गती मिळेल, आयसीयुमध्ये अत्यवस्थ आणि जीवाला धोका असलेल्या रुग्णांवर योग्य वेळी आवश्यक उपचार झाल्यानंतर हा धोका कमी होतो. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविलद्यालय आणि रुग्णालयामधील ६० खाटांचे मॉड्युलर आयसीयू लातूर शहर, जिल्हा आणि परिसरातील अत्यावश्यक रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR